जळगाव जिल्ह्यात नाल्यात पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून शेतकरी तर वीज पडून गुराखी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:33 PM2018-06-23T12:33:25+5:302018-06-23T13:01:33+5:30
दोन बैलांसह गायी मृत्यूमुखी
जळगाव- शेतातील काम आटोपून बैलगाडीने घरी परतत असताना नारायण मोतीराम पाटील (वय-५०, रा़ वराड बु़ ता़ धरणगाव) यांना नाल्यात पडलेल्या विजेच्या तारेमुळे जोरदार धक्का बसला त्यात त्यांचा व दोन बैलांचा व बैलगाडीमागे बांधलेल्या गायीचाही मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता धरणगाव तालुक्यातील वराड बु़ येथे घडली़ दुसºया एका घटनेत बोदवड तालुक्यात जुनोने येथे रतन देवसिंग तारे या गुराख्याच्या अंगावर वीज पडून ठार झाले.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, शेतकरी नारायण पाटील हे सकाळी बैलजोडी घेवून शेतात गेले होते. दुपारी ते शेतातून घराकडे बैलगाडीने जाण्यासाठी निघाले़ यावेळी त्यांच्यासोबत गावातील रामा रूपचंद महाजन हे ा होते़ जोरदार पाऊस झाल्यामुळे विजेची तार तुटून नाल्यात पडली होती. नाल्याला पूर आला होता़ त्यातून जात असताना विजेच्या तारेचा बैलगाडीला स्पर्श होताच नारायण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन्ही बैल व बैलगाडीला मागे बांधलेली गाय देखील ठार झाली.
रामा महाजन बालंबाल बचावले
रामा महाजन यांनी बैलगाडीवरून उडी घेतल्याने ते बचावले़ नारायण पाटील यांच्या पश्चात पत्नी, अरविंद व कुणाल हे दोन मुले आहेत़