चोसाका चालू होण्यासाठी शेतकऱ्यांनी केला एकमुखी ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:23+5:302021-06-28T04:12:23+5:30
कारखाना चालविण्यास आमची हरकत नसून आम्हाला आमचे हक्काचे पैसे कधी मिळतील? याबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वपक्षीय नेते व संचालक मंडळास ...
कारखाना चालविण्यास आमची हरकत नसून आम्हाला आमचे हक्काचे पैसे कधी मिळतील? याबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वपक्षीय नेते व संचालक मंडळास सभासद शेतकऱ्यांनी जाब विचारला. त्यावर माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील यांनी उसाचे पैसे देण्याबाबत एक प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला. त्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन वर्षांपूर्वीचे राहिलेले पैसे कारखाना सुरू होईल, त्यावेळेस दिले जातील तर एफआरपीनुसार २०१५-१६मधील सहाशे रुपये प्रतिटन राहिलेले उसाचे पैसे यापैकी ३०० रुपये रोखीने दिले जातील व प्रतिटन ३०० रुपये या शेतकऱ्यांच्या शेअर भागभांडवलमध्ये जमा करण्यात येईल, असा प्रस्ताव ठेवला आणि यास सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी मंजुरी दिली.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, भाजपाचे घनश्याम अग्रवाल, पीपल बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, यशवंत निकम, भाजपाचे शांताराम पाटील, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम माळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कांतीलाल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय दत्तात्रय पाटील, संचालक व जि.प.चे माजी सदस्य आनंदराव रायसिंग, नीलेश पाटील, गोपाळ धनगर, चंद्रशेखर पाटील संभाजी गोरख पाटील, अनिल पाटील, भरत दत्तात्रय पाटील, भरत रूपसिंग पाटील, प्रवीण गुजराथी, शेतकी संघाचे प्रेसिडेंट दुर्गादास पाटील, व्हाईस प्रेसिडेंट धनगर हे उपस्थित होते.
अहवाल वाचन प्रभारी सचिव आधार पाटील यांनी केले तर आभार शशी देवरे यांनी मानले.
शेतकरी नारायण आधार पाटील, प्रदीप लिंबा पाटील, गणपूर येथील प्रमोद पाटील, लोणी पंचक येथील हेमकांत पाटील, गोरगावले येथील शेतकरी संघटनेचे पाटील यांनी शेतकऱ्यांचे राहिलेले पेमेंट कधी देणार याबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. सभा यशस्वितेसाठी चेअरमन अतुल ठाकरे, संचालक मंडळ कारखान्याचे सर्व कामगार, कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, आधार पाटील यांनी परिश्रम घेतले.
चाैकट
१५ नव्हे, २५ वर्षांसाठी कारखाना चालवण्यास देणार
चेअरमन यांनी प्रास्ताविकातून कोणताही कारखाना हा भाडेतत्त्वावर १५ वर्षांच्या वर देता येत नाही, असा कायदेशीर नियम आहे. परंतु कारखाना चालविण्यास घेणारी पार्टीने २५ वर्षे कारखाना आम्हाला भाडे तत्त्वाने मिळावा, अशी मागणी केल्याने पहिल्या पंधरा वर्षाचा ठराव झाल्यानंतर पुन्हा दहा वर्षांनंतर संबंधित कारखाना भाडेतत्त्वावर घेणारे याकडेच कारखाना भाड्याने चालविण्यास द्यावा, यालाही शेतकऱ्यांनी एकमुखी संमती दर्शवली. यापूर्वी कारखान्याकडे बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे कर्जरूपात ४८ कोटी रुपये घेणे होते. त्यात बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी २७ कोटी एकरकमी द्यावे आणि कारखान्यावरचा कर्ज बोजा कमी करून देऊ, यास होकार दिला आहे. तसेच कामगारांनीही बिनशर्त या कारखान्याला सुरू होण्यासाठी होकार दर्शविला आहे.
===Photopath===
270621\27jal_4_27062021_12.jpg
===Caption===
चोसाका चालू होण्यासाठी शेतकऱ्यांनी केला एकमुखी ठराव