शेतकऱ्यांनो संघटित व्हा : खासदार राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 09:59 PM2018-05-02T21:59:38+5:302018-05-02T21:59:38+5:30
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शेतकरी सन्मान दौरा
आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.२ : व्यापाºयांची मुजोरी मोडून काढण्यासाठी शेतकºयांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख- खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेतकºयांना सन्मान मिळावा यासाठी राजू शेट्टी राज्यभर दौरा करीत आहेत. त्यात २ रोजी दुपारी शेतकरी संघटनेचे नेते किरण पाटील यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सभेत बोलत होते.
जगणं मुश्किल झाले आहे हे खरे असले तरी आम्ही मरणार नाही, जगणार आहोत, असा निर्धार या दौº्यातून केला जात आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी केळीबाबत डॉ.देसाई यांनी, तीन-चार वर्षांपासून केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळत नाही, बोर्डापेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळतो, असे सांगितले.
सभेत विविध नेत्यांनीही काही प्रश्न उपस्थित केले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काहींना सत्तेची उब घ्यायची आहे आणि शेतकºयांचा नेता म्हणूनही मिरवायचे आहे. शेतकºयांचा नेता कोणी म्हणत असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र होत नाहीत, म्हणून असे म्हणणाºयांना भामटा म्हटले पाहिजे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता, चिमटा मारला.
या वेळी गजानन पाटील, भंगाळे, माणिक कदम, घनश्याम चौधरी, हंसराज वाडगुळे, सोमनाथ बोराडे, पूजा मोरे, राशिका ढगे, डॉ.प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, सयाजी मोरे, संदीप जगताप, किशोर ढगे, डॉ.देसाई, राजाराम पाटील, साहेबराव पाटील, शिवाजी पाटील, संजीव बाविस्कर, तुळशीराम धोंडू पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.