शेतक:यांचा धानोरा येथे रास्तारोको
By admin | Published: June 8, 2017 01:23 PM2017-06-08T13:23:24+5:302017-06-08T13:23:24+5:30
शेतकरी कृती समितीतर्फे आज अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील धानोरा येथे रास्तारोको करण्यात आला.
Next
ऑनलाईन लोकमत
बिडगाव,ता.चोपडा,दि.8 - शेतक:यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, वीजबिल माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीतर्फे आज अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील धानोरा येथे रास्तारोको करण्यात आला.
धानोरा येथील जळगाव चौफुलीवर सकाळी 9 .30 ते 10.30 यावेळेत शेतक:यांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यावेळी शेतक:यांनी शासनविरोधी घोषणा दिल्या.
यावेळी संजीव सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे, अॅड. हेमचंद्र पाटील, प्रकाश साहेबराव पाटील, माणिकचंद महाजन यांच्यासह 500 ते 700 शेतकरी सहभागी झाले होते. अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पडले.