शेतक:यांच्या कृषि पंचाचे वीज बिल माफ न केल्यास जळगाव व धरणगावात शिंगाडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:38 PM2017-11-04T12:38:51+5:302017-11-04T12:41:20+5:30
गुलाबराव देवकर यांची माहिती : गिरणा धरणातून लवकर आवर्तन सोडण्याची मागणी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 4 - रब्बी हंगामासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी गिरणा धरणातून धरणगाव व जळगाव तालुक्यासाठी पाण्याचे तीन आवर्तन आरक्षित करण्यात यावे तसेच शेतक:यांचे या वर्षाचे वीज माफ करण्यात यावे, अन्यथा 19 रोजी धरणगाव व 20 रोजी जळगाव येथे वीज कंपनीच्या कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत दिला.
शुक्रवारी संध्याकाळी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषद झाली. या वेळी त्यांनी ही मागणी केली. या प्रसंगी वाल्मीक पाटील, मंगला पाटील, रवींद्र पाटील, मधुकर पाटील, विलास पाटील उपस्थित होते.
15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यक
जिल्हाधिकारी व गिरणा धरणाच्या अधिका:यांना निवेदन देऊन चर्चा केली असता 22 नोव्हेंबर दरम्यान पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर या बाबत निर्णय होईल, असे सांगण्यात आले. मात्र तो र्पयत खूप उशीर होईल. त्यामुळे 15 नोव्हेंबर दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे तसेच पालमंत्र्यांनी या बाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सोबतच शेत मालाला वाढीव भाव मिळावा कापूस खेरदी केंद्रांवर पुरेसी यंत्रणा उपलब्ध करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
मतदार संघात मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, अशी टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली.
आता घोडा मैदान जवळ
गुलाबराव पाटील यांनी जे बोलायचे आहे ते विकासावर बोलावे. मी काय केले आहे, हे जनतेला माहित आहे. माङयावर दोन वर्षे जे संकट आले, त्यामुळे त्यांना संधी मिळाली. अन्यथा किमान पाच पंचवार्षिक तरी त्यांना संधी मिळाली नसती. असे असले तरी आता घोडा मैदान जवळच असून जनताच हिशेब करेल, असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला.
शिवसेना व त्यांचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात. या पेक्षा त्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. राजीनामा देतो, असे अनेकदा सांगून झाले असून नुसते सांगता काय सत्ता सोडून द्या, खिशातच राजीनामा घेऊन काय फिरता, तो एकदाचा देऊन टाका, अशीही मागणी देवकर यांनी केली.