६०० वर शेतकरी अजूनही रांगेत

By admin | Published: March 9, 2017 12:11 AM2017-03-09T00:11:56+5:302017-03-09T00:11:56+5:30

रावेर येथे संताप : आतापर्यंत सुमारे चार हजार क्विंटल खरेदी

Farmers still queue up to 600 | ६०० वर शेतकरी अजूनही रांगेत

६०० वर शेतकरी अजूनही रांगेत

Next

रावेर : शहरातील शासकीय तूर खरेदी केंद्रात १५८ शेतकºयांची सुमारे चार हजार १९४  क्विंटल तुरीची खरेदी झाल्यानंतर   बारदानाचा तुटवडा निर्माण झाला. रावेर बाजार समितीत नोंदणी करण्यात आलेल्या ७७१ पैकी ६१३ शेतकरी अद्याप प्रतीक्षा रांगेत आहेत.  बारदान संपल्याने तूर खरेदीला ब्रेक बसला आहे. दरम्यान, कोलकाता येथून बारदानाचा ट्रक निघाला असून शुक्रवारी बारदान पोहचण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
रावेर येथे सुरू झालेल्या शासकीय तूर खरेदीला गेल्या ५, ६ दिवसांपासून डबल इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे धडाका सुरू झाल्यानंतर आज बारदान संपले. १२ पेक्षा कमी आर्द्रता व एफएक्यू दर्जाची तूर खरेदी करण्याच्या गाळणीमुळे शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत व्यापाºयांकडे आपला मोर्चा वळवावा लागला आहे. बाजार समितीच्या  लिलाव बाजारात सरासरी  ३५०० रु. प्रती क्विंटल दराने अर्थात शासनाच्या हमीभावापेक्षा दीड हजार रु. प्रती क्विंटल दराने तूर मोजून द्यावी लागत असल्याचे   चित्र आहे. दरम्यान, शासकीय तूर खरेदी केंद्रातील ७७१ क्रमांकाची दीर्घ प्रतीक्षा यादी व खरेदी प्रक्रियेत बारदानासारख्या निर्माण होणाºया तांत्रिक अडचणींच्या भीतीमुळे तथा  निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीमुळे तूर या  धान्य साठवणुकीची क्षमता नसल्याने शेतकरी आपला मोर्चा नाइलाजाने बाजार समिती लिलावाकडे वळवत असल्याची शोकांतिका आहे. परिणामत: शासन हमीभाव व कृउबाच्या  लिलाव बाजारभावात  दीड हजार रुपयांचा फरक असल्याने व्यापारी  तर शेतकºयांच्या प्रतीक्षा यादीत शेतकºयांच्या रूपात शिरकाव करणार नाहीत ना ? असा संशय शेतकरीवगार्तून व्यक्त होत आहे. बाजार समिती प्रशासन व खरेदी विक्री संघ  प्रशासन  पारदर्शकता असल्याचा दावा करीत असून,  सामान्य शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात येत असल्याची पुष्टी जोडत आहे. 
मुक्ताईनगर -चांगदेव येथील तूर खरेदी केंद्र १५ दिवसांपासून बंद असल्याने शासनाचा निषेध म्हणून केंद्रासमोर ट्रॅक्टरवरील तुरीच्या पोत्यावर बसून चिंचखेडा बु.।। येथील शेतकरी प्रदीप बाबूराव पाटील (गावंडे) यांनी मुंडन केल्याने शेतकºयांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. आता या  प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली आहे. बारदान तत्काळ उपलब्ध झाले नाही तर चांगदेव येथे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केला.   चांगदेव केंद्रावर रोज एक हजार क्विंटल तूर खरेदीसाठी आणली जाते. मात्र केंद्रच बंद आहे. खरेदी केंद्राचे फलकसुद्धा काढून घेण्यात आले आहेत. अधिकारी हजर  राहत नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.              तालुक्यातील  ११ लाख क्विंटल तूर पडून असल्याचे शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे. चांगदेवप्रमाणेच  अंतुर्ली व कुºहा येथेदेखील तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सेनेतर्फे करण्यात आली. बारदान तत्काळ           उपलब्ध न केल्यास शेतकºयांसमवेत संपूर्ण तालुक्यात शिवसेना आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सुनील पाटील, प्रदीप पाटील, सुरेश येवले, राजेंद्र पाचपांडे, इंद्रसिंग पाटील, रतनसिंग पाटील, विलास पाटील, जीवनसिंग पाटील, राजेंद्र तायडे,                      कमलाकर राणे, दिलीप भोळे, नीलेश बोराखडे, भाऊराव राठोड, पप्पू फालक, प्रवीण चौधरी यांच्या सह्या             आहेत.
आजअखेर चार हजार १९४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. आज मात्र बारदान संपुष्टात आले असून, कोलकात्याहून बारदानाचा ट्रक निघाला असून शुक्रवारी बारदान दाखल होणार असल्याची शक्यता आहे.
- प्रशांत पाटील,
ग्रेडर, रावेर शासकीय तूर खरेदी केंद्र
तुरीचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झालेले असताना केवळ बारदानाअभावी शेतकºयांना त्रास देणे हे गैर आहे. अन्नदात्यांची दुर्दशा होत असेल तर सर्वसामान्यांचे काय?
- भारती भोई,
पं.स.सदस्या
शुक्रवारी बारदान येण्याची शक्यता
रावेर येथील शासकीय तूर खरेदी केंद्रासाठी येत्या शुक्रवारी बारदान उपलब्ध होण्याची शक्यता शासकीय तूर खरेदी केंद्राच्या सूत्रांनी व्यक्त केली. तोपर्यंत तूर खरेदीची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. दरम्यान, तूर खरेदी थांबल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत असल्याची स्थिती आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Farmers still queue up to 600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.