शेतक:यांच्या कर्जमाफीसाठी पाचोरा येथे रास्ता रोको
By admin | Published: April 7, 2017 12:48 PM2017-04-07T12:48:35+5:302017-04-07T12:48:35+5:30
तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पाचोरा, जि. जळगाव, दि. 7 - शेतक:यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा या मागणीसह जळगाव-पाचोरा-सातगाव रस्त्याप्रश्नी माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्तारोको करण्यात आला. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. सध्या शेतकरी रस्त्यावर आला असून बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी देऊन आणि त्यांचे सात बारा उतारे कोरे करावे व या आत्महत्या रोखण्यात याव्या अशी मागणी या वेळी करण्यात आली. जळगाव-पाचोरा-सातगाव राष्ट्रीय महामार्गाची शासनाची घोषणा फसवी असून हा रस्ता हस्तांतरण करण्यामागे या मार्गावरील मद्य सम्राटांना वाचविणे हा कुटील डाव असल्याचे यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले. कार्यकत्र्यानी रस्त्यावर ठिय्या देत विविध घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. यावेळी जळगाव, भडगाव, गोंदेगाव व शहरातून येणा:या वाहनांची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी आंदोलनकत्र्यांना ताब्यात घेतले. तहसीलदार बी.ए .कापसे यांना निवेदन देण्यात आले.