शेतक:यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुन्हा बंद पाडले
By admin | Published: May 8, 2017 05:20 PM2017-05-08T17:20:13+5:302017-05-08T17:20:13+5:30
संतप्त शेतक:यांची झटापट : मोराणेजवळ शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन
Next
धुळे, दि.8- धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून जाणा:या नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे बंद असलेले काम सुरू करण्यात आल्याने शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी मोराणेजवळ आंदोलन करून काम बंद पाडल़े यावेळी कंपनीचे सदस्य व शेतक:यांमध्ये झटापटही झाली़
शेतकरी संघर्ष समितीने 26 एप्रिलपासूनच चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होत़े त्याचप्रमाणे मागण्या मान्य होईर्पयत चौपदरीकरणाचे काम सुरू होऊ न देण्याची भुमिका घेतली होती़ त्यामुळे चौपदरीकरणाचे काम तेव्हापासून बंदच होत़े मात्र त्यानंतर कंपनीच्या सदस्यांकडून काम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे लक्षात आल्याने शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी मोराणे गावाजवळ आंदोलन केल़े आंदोलनात संग्राम पाटील, रमेश माळी (नेर), नंदु पाटील (फागणे), राजेंद्र पाटील (सौंदाणे) यांच्यासह शेतकरी सहभागी झाल़े शेतक:यांच्या या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता़