भारनियमन व विजेच्या कमी दाबामुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:29+5:302020-12-09T04:12:29+5:30
शिरसोली : शिरसोली शेतशिवारात भारनियमन व कमीदाबाच्या वीजप्रवाहामुळे शेतातील पिके वाळू लागली आहेत. वीजेअभावी विहिरीत पाणी असले तरी त्याचा ...
शिरसोली : शिरसोली शेतशिवारात भारनियमन व कमीदाबाच्या वीजप्रवाहामुळे शेतातील पिके वाळू लागली आहेत. वीजेअभावी विहिरीत पाणी असले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
शिरसोली परिसरात यंदा विहिरींना पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा, दादर, बाजरी, फुले व इतर पिकांची लागवड केली आहे. परंतु नायगाव शिवार, काळी भुई शिवारात एक दिवस आड भारनियमन सुरु आहे. मात्र भारनियमन नसले तरी अनेक वेळा वीज गुल असते. तर कधी कमीदाबाने वीज प्रवाह असल्याने कृषी पंपच चालत नाहीत. याचा फटका पिकांना बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
________________________________
विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र कधी कमी दाबाने वीज पुरवठा होतो तर कधी वीज गायब असते. या पाणी असूनही पिके वाळू लागली आहेत.
- हरी बोबडे शेतकरी, नायगाव शिवार
------------
शेतात गहू, ज्वारी व बाजरीची लागवड केली आहे. परंतु भारनियमन व्यतिरिक्त अनेक वेळा वीज नसते. या मुळे पिकांना पाणी देता येत नाही.
- सागर ताडे, शेतकरी,नायगाव शिवार
------------
विजेच्या कमी दाबामुळे रात्रीच्या वेळेस थंडीत जीव धोक्यात घालून शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते. अनेक वेळा रात्रीही वीज नसते.
- शहाजी पाटील, शेतकरी, काळी भुई शिवार