जळगाव येथे हरभरा खरेदी केंद्रावरील गैरसोयींनी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:54 PM2018-05-10T12:54:00+5:302018-05-10T12:54:00+5:30

आपसातील वादाचाही फटका

farmers suffer in Jalgaon | जळगाव येथे हरभरा खरेदी केंद्रावरील गैरसोयींनी शेतकरी त्रस्त

जळगाव येथे हरभरा खरेदी केंद्रावरील गैरसोयींनी शेतकरी त्रस्त

Next
ठळक मुद्देकेंद्र बदलण्याची मागणीमाल नेताना मोठी कसरत

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेेंंतर्गत सुरू असलेले शिवाजीनगरातील हरभरा खरेदी केंद्र गैरसोयीचे ठरत असून या ठिकाणी असलेल्या अनेक गैरसोयींनी शेतकरी त्रस्त आहेत. यामध्ये भरात भर म्हणजे मंगळवारी मापाड्यांच्या आपसातील वादामुळे खरेदी बंद पडून शेतकऱ्यांना सहा तास ताटकळत रहावे लागले. दरम्यान, बुधवारी आलेल्या सर्व ट्रॅक्टरमधील मालाची खरेदी केल्याचा दावा तालुका शेतकी संघाच्या वतीने करण्यात आला.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंंतर्गत सुरू असलेले शिवाजीनगरात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी माल नेताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सोबतच तेथे गेल्या नंतर प्रचंड अस्वच्छता असून बसायला देखील जागा नाही. त्यामुळे गर्दीमध्ये रांगा लागलेल्या असताना कोठे बसावे, असा प्रश्न शेतकºयांना पडतो.
मंगळवारी येथे खरेदीस सुरुवात होत नाही तोच मोजणीवरून शेतकी संघ व कृउबाच्या मापाड्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर खरेदी केंद्रास थेट कुलूप लावल्याने खरेदी बंद पडली. त्यामुळे येथे ट्रॅक्टरच्या लांब रांगा लागल्या. दुपारी खरेदी सुरू झाली मात्र तोपर्यंत शेतक-यांना ताटकळत रहावे लागले.
बुधवारीदेखील सकाळी काहीसी गर्दीच होती. अखेर शेतकी संघाचे चेअरमन उत्तमराव सपकाळे व संचालकांनी येथे भेट देऊन सूचना दिल्या.

हरभरा खरेदीविषयी वेगवेगळ््या गावातील शेतकºयांना वार ठरवून दिला आहे. ठरविलेल्या दिवशीच माल आणल्यास गर्दी होत नाही व सर्वांची खरेदी वेळेत होऊ शकते.
- उत्तमराव सपकाळे, चेअरमन, शेतकी संघ.

हरभरा केंद्रावर अनेक अडचणी असून येथील अस्वच्छतेने शेतकºयांना त्रास होतो. हे खरेदी केंद्र तेथे न ठेवता दुसरीकडेच असावे.
- सोपान कावडे, शेतकरी.

Web Title: farmers suffer in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव