पारोळ्यात शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:33 PM2020-02-07T22:33:12+5:302020-02-07T22:34:57+5:30
शेतकरी हिरामण बाबूराव बारी यांनी कर्जामुळे आत्महत्या केली
पारोळा, जि.जळगाव : शहरातील मडक्या मारुती भागातील शेतकरी हिरामण बाबूराव बारी (७०) यांनी कर्जामुळे काही तरी विषारी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या केली ही घटना ७ रोजी सायंकाळी चारला घडली.
येथील शहरातील मडक्या मारुती भागातील रहिवासी हिरामण बाबूराव बारी हे वंजारी खुर्द भागात असलेल्या शेतीत मका व गहू पेरणी केली होती. ते नेहमीप्रमाणे ७ रोजी शेतात गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतले नाही. त्यांचा लहान मुलगा देवीदास हा वडील शेतातून का आले नाही. म्हणून तो त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला होता. वडील शेतातील घराच्या ओट्यावर पडलेले दिसले. त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता. देवीदास हा घाबरला व रिक्षाने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णल्यात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी शर्थीचे प्रयन्त केले. पण उपचारादरमान्य त्यांचा मृत्यू झाला.
हिरामण बारी हे गेल्या अनेक दिवसांपासून वैफल्यग्रस्त अवस्थेत होते. या वर्षी हातचा सर्व हंगाम गेल्याने निराशा आली होती. त्यांच्यावर हात उसनवारीचे ७८ हजार खाजगी बँकेचे व वि.का. संस्थेचे ७५ हजार रुपये असे कर्ज होते आणि या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
पारोळा पोलिसांना सुनील बारी यांनी माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. तपास पो.हे.काँ. बापूराव पाटील करीत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ८ रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.