सातोड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:23 PM2020-04-19T17:23:35+5:302020-04-19T17:23:43+5:30

नापिकी व कर्जामुळे आले होते नैैराश्य

Farmer's suicide at Satod | सातोड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सातोड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext


मुक्ताईनगर : तालुक्यातील सातोड येथील तरुण शेतकरी मोतीलाल रामदास पाटील (वय ४५) यांनी सततच्या नापिकीला व त्यामुळे झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
मोतीलाल पाटील यांच्या मयत वडिलांच्या नावे जवळपास दहा एकर शेती सातोड शेती शिवारात आहे. तर मोतीलाल पाटील स्वत: ची शेती करत होते. त्यांचेवर जवळपास शेतीखर्चासाठी एक लाख ५१ हजार रुपये कर्ज तसेच उसनवारी पोटी एक लाख २५ हजार रुपये इतके कर्ज झाले होते. मोतीलाल पाटील यांनी १४ एप्रिल रोजी आपल्या सातोड शेती शिवारातील शेतातच काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता चार १८ एप्रिल रोजी उपचार घेताना निधन झाले. त्यांचे पश्चात आई मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

Web Title: Farmer's suicide at Satod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.