सावखेडा खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:23 PM2019-11-25T18:23:40+5:302019-11-25T18:25:31+5:30
सावखेडा खुर्द येथील प्रमोद हरी बखाल या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : सावखेडा खुर्द, ता.रावेर येथील प्रमोद हरी बखाल (वय ३५) या शेतकºयाने घरात एकटे असताना पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ रोजी घडली. सलग दोन वेळा पिकांचे नुकसान झाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.
सूत्रांनुसार, प्रमोद बखाल हे शेती करीत असत. त्यांची सहा महिन्यांपूर्वी उभी असलेली केळीची बाग उद्ध्वस्त झाली होती. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी हे नुकसान सहन करत शेतामध्ये कपाशीची पेरणी केली व यावेळेसही अवकाळी पावसामुळे त्यांचे कपाशीचेही नुकसान झाले. या पेरणीसाठी त्यांनी नातेवाइकांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. त्यात त्यांचे भरपूर नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे नातेवाईकांचे उसनवारीचे पैसे कसे परत करायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह, तसेच मुलांचे शिक्षण कसे करायचे? या विवंचनेतच ते बºयाच दिवसांपासून होते.
२५ रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी पंख्याला दोरी बांधून फाशी घेतली. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी लगेचच त्यांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना डॉ.एन.डी.महाजन यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदन डॉ.स्वप्नीषा पाटील यांनी केले. पुढील तपास एपीआय राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, देवेंद्र पाटील, युसुफ तडवी करीत आहेत.