वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतक:यांचा मोर्चा
By admin | Published: June 5, 2017 05:50 PM2017-06-05T17:50:58+5:302017-06-05T17:50:58+5:30
नशिराबाद परिसरातील शेतक:यांचा संताप : आठ दिवसात बैठक घेवून प्रश्न मार्गी लावणार; जिल्हाधिका:यांचे आश्वासन
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव/नशिराबाद,दि.5- नीलगाईंसह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त व तालुक्यातील शेतक:यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या आठ दिवसात तालुक्यात जाऊन बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवारी जळगाव तालुक्यातील मोर्चेकरी शेतक:यांना दिले.
नशिराबाद, बेळी, निमगाव, भागपूर, कंडारी, उमाळे, कुसुंबा, जामनेर तालुक्यातील नेरी, गाडेगाव व इतर गावांना तसेच भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, बेलव्हाळ, वराडसिम, गोजोरे, गोंभी, कु:हे पानाचे, मांडवे दिगर, शिंदी, सुरवाडे, खंडाळा, मोंढाळा आदी गावांनजीकच्या शेती शिवारात नीलगाईच्या मुक्त संचारामुळे शेतक:यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकरी लागवडीपासून कापणी र्पयतचा सर्व खर्च केल्यावर पीक हाती येत असताना नीलगाई पिके नष्ट करत आहेत. परिणामी शेतक:यांचे प्रचंड नुकसान होत असून तो कर्जबाजारी होत असल्याच्या शेतक:यांच्या तक्रारी आहेत.
सततच्या दुर्लक्षामुळे मोर्चा
शेती शिवारात नीलगाई उभ्या पिकांचे नुकसान करत असल्याने तालुक्यातील शेतक:यांनी सोमवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विविध घोषणा देत हे शेतकरी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर मोर्चे क:यांचे शिष्टमंडळ गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिका:यांच्या दालनात आले. यावेळी महिलांचादेखील समावेश होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.