शेतक:यांनी मागितली आता आत्महत्येची परवानगी
By admin | Published: June 22, 2017 11:04 AM2017-06-22T11:04:49+5:302017-06-22T11:10:46+5:30
शेतक:यांचा संताप : ट्रक टर्मिनसचा वाद, आयुक्तांकडून पर्यायांचे आश्वासन
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.22 - ट्रक टर्मिनससाठी असोदा शिवारातीलच नापिक जमिनीचे संपादन करण्याचा अथवा एमआयडीसीने ट्रक टर्मिनससाठीच राखीव ठेवलेल्या जागेचा पर्याय तपासून पाहण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी असोद्यातील आरक्षित जागेतील शेतक:यांच्या शिष्टमंडळाला दिले. न्याय देऊ शकत नसाल तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.असा संताप यावेळी शेतक:यांनी व्यक्त केला.
भूसंपादनास शेतक:यांचा विरोध असताना व आरक्षित जागेतूनच राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता गेलेला असताना या जागेच्या भूसंपादनाचा अट्टाहास का? त्याऐवजी एमआयडीसीच्या आरक्षित जागेचा पर्याय का तपासला जात नाही? असे वृत्तच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत जि.प. सदस्य लालचंद पाटील व शेतक:यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी वरील आश्वासन दिले. तर या शेतक:यांनी हे आरक्षणच रद्द व्हावे, अशी मागणी जिल्हाधिका:यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनपाने ट्रान्सपोर्ट नगरची कराराने दिलेली जागा परत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे मनपाने असोदा शिवारातील गट नं.1214 ते 1219 व गट नं.1199 या शेतजमिनीवर ट्रक टर्मिनस आरक्षण टाकले आहे. त्यानुसार ट्रक टर्मिनसचे आरक्षण असलेल्या असोदा शिवारातील जागेचे संपादन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतक:यांचा यास तीव्र विरोध आहे. अंबादास दुसाने या शेतक:याने तर थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. गेल्या 70 वर्षापासून आपण ही जमीन कसत असून आता शेतक:यांना देशोधडीला लावण्याचा प्रय} या भूसंपादनातून सुरू आहे.
एमआयडीसीची ट्रक टर्मिनससाठीच आरक्षित सरकारी जमीन उपलब्ध असताना शेतक:यांकडून जमीन घेण्याचा उद्देश काय? असा सवालही त्यांनी केला आहे. शेतक:यांचा ही जागा देण्यास नकार असतानाही मनपाकडून या जागेचे संपादन करण्याचा अट्टाहास केला जात आहे.