शेतक:यांना कर्ज माफी मिळावी - रामदास आठवले
By admin | Published: June 9, 2017 04:33 PM2017-06-09T16:33:52+5:302017-06-09T16:33:52+5:30
बच्चू कडूंचे विधान अतिरेकीपणाचे
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9- अडचणीतील शेतक:याला कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत. ऑक्टोबरमध्ये हा निर्णय लागू होईल, पण विरोधकांनी केवळ राजकारण न करता सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चेतून हा निर्णय लवकर होईल असे प्रय} करावेत अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकार विभागातर्फे 2301 दिव्यांगांना सायकली व विविध अत्याधुनिक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी आठवले येथे आले होते.
‘ते’ विधान अतिरेकीपणाचे
शेतकरी समस्यांच्या विषयावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर बॉम्ब टाकण्याची भाषा केली त्यांचे हे विधान अतिरेकीपणाचे असून या प्रश्नी अशी भूमिका घेण्यापेक्षा शेतक:यांच्या कर्ज माफीच्या विषयावर सर्वसमावेशक तोडगा निघावा अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. अडचणींमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी कर्ज माफी मिळावी अशी भूमिका आमचीदेखील आहे. विरोधकांनी याप्रश्नी राजकारण न करता चर्चेतून मार्ग कसा निघेल, ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी लागू होईल, त्यापेक्षा अगोदर ती लागू कशी होईल यासाठी चर्चा करावी असेही ते म्हणाले.
ओबीसी महामंडळाला दर्जा
केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. 2022 र्पयत देशात एकही व्यक्ती बेघर राहू नये असे केंद्राचे प्रय} आहेत. प्रत्येकाचे बॅँकेत खाते असावे ही भूमिका घेऊन देशात 26 कोटी व्यक्तींचे बॅँकेत जनधन योजनेत खाते उघडण्यात आले. उज्जवला योजनेतून महिलांना गॅस कनेक्शन असे अनेक चांगले निर्णय पंतप्रधानांनी घेतले. ओबीसी महामंडळाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक लोकसभेत संमत झाले. जुलैत ते राज्यसभेत मंजूर होईल. हे सरकार मुस्लिम विरोधी नाही त्यांनाही न्याय देण्याचा प्रय} असतो.
नोटबंदीचा निर्णय योग्यच
क्रांती करायची तर त्रास हा सहन करावाच लागतो. नोटबंदीचा निर्णय हा क्रांतीकारी होता. विकासासाठी हा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. लवकरच लागू होणा:या जीएसटी ही नवी करप्रणाली म्हणजे केंद्राचा अतिशय चांगला निर्णय असल्याचेही ते म्हणाले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी. पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल उपस्थित होते.