शेतमाल वाहतुकीसाठी लवकरच किसान रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:00 PM2020-02-02T12:00:27+5:302020-02-02T12:02:11+5:30
व्यापार, उद्योगाला दिलासा तर कृषी क्षेत्राची निराशा, सुवर्ण व्यवसायाचाही अपेक्षाभंग
जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात फळ व भाजीपाला वाहतुकीसाठी‘किसान रेल’ सुरू करण्याची घोषणा होताच त्याचे स्वागत होत आहे. केळीचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या जळगाव जिल्ह्याला या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. केळीसह व अन्य फळ भाजीपाला वाहतूक सुलभ होणार आहे. भुसावळ स्थानकावरून ही रेल्वे सुटणार असून आठवडाभरात तसे पत्रही मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी दिली. दुसरीकडे व्यापार, उद्योग क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे तर कृषी क्षेत्राची तसेच जळगावातील मुख्य व्यवसाय असलेल्या सुवर्ण व्यवसायाची अर्थसंकल्पाकडून निराशा झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच त्या बाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात केळी पाठविली जाते. या वाहतुकीत केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्याही तक्रारी होत्या. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात फळ, भाजीपाला, शेतीमाल वाहतुकीसाठी ‘किसान रेल’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
या रेल्वेमुळे जिल्ह्यातील केळी वाहतुकीला मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास राजकीय मंडळींसह शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
माफक दरात वाहतूक
ज्या ठिकाणी शेतीमालाचे जास्त उत्पादन आहे, त्या भागात या रेल्वेला थांबा राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. किसान रेल माफक दरातही उपलब्ध राहणार असून आठवडाभरात या रेल्वे विषयी पत्र प्राप्त होईल, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
छोट्या निर्यातदारांना दिलासा
उद्योग क्षेत्राचा विचार केला तर छोट्या निर्यातदार उद्योगांना अर्थसंकल्पामुळे दिलासा मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. घोषित करण्यात आलेल्या नवीन प्रणालीमुळे प्रक्रियेचा वेळ वाचून निर्यातदारांना परतावाही लवकर मिळू शकेल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
या सोबतच ‘टॅक्स आॅडीट’ची मर्यादा दीड कोटीवरून ५ कोटीप़र्यंत वाढविल्याने त्याचा लाभ व्यापाºयांसह सर्वांना होणार असल्याने त्यामुळे ही दिलासादायक बाब असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
कृषी क्षेत्राची निराशा
अर्थसंकल्पात शेतकºयांचे खरे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी खरा उत्पादन खर्च व नफा मिळून किमान आधारभूत किंमत ठरवावी व भाव न मिळाल्यास भावांतर योजना राबवण्याची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने शेतकºयांची निराशा झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
सुवर्णनगरीची निराशा
अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क व जीएसटी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने सुवर्ण व्यवसायाची निराशा झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
शेतकºयांचे उत्पन्न वाढविसाठी मदत
शेतकºयांचे उत्पन्न वाढावे यासाठी १६ कलमी कार्यक्रम सरकारने हाती घेण्याचे ठरविले ही चांगली बाब आहे. कृषी व कृषी पूरक योजनांसाठी १ लाख ५१ हजार ५१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सौर कृषी पंप योजनेवर भर देण्यासाठी भारतभरातून सुमारे २० लाख सौर कृषि पंप बसविण्याचे उद्दिष्ट शेती सिंचनासाठी आशादायी चित्र ठरू शकेल. करार शेती, शाश्वत पीक पद्धती, सेंद्र्रीय शेती, शेतीपूरक उद्योग या केंद्र्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्याºया राज्य सरकारांना प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाईल. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सकारात्मक आणि फायद्याचे होईल. कृषी उडान योजनेतून आदिवासी भागातील शेती उन्नत करणे, अशा प्रकारे चौफेर विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आशादायी म्हणता येईल तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. जैन इरिगेशन काम करीत असलेल्या वेगवेगळ््या क्षेत्रात भरघोस काम करण्याची संधी या अर्थसंकल्पाने उपलब्ध करून दिलेली आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सि.लि.
समाधानकार अर्थसंकल्प
समाधानकारण अर्थसंकल्प असून घोषित करण्यात आलेल्या निर्यात धोरणामुळे छोट्या निर्यातदारांना मोठा फायदा होईल. आयकर मर्यादेच्या नवीन घोषणेने भरणा करण्याची संख्या वाढू शकेल.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.
व्यापा-यांकडून स्वागत
अर्थसंकल्प चांगला असून सामान्यांना दिलासा देणारा आहे. पाच कोटी पर्यंतच्या उलाढालीपर्यंत टॅक्स आॅडीटची मर्यादा वाढविल्याने व्यापाºयांच्यादृष्टीने चांगाल निर्णय आहे.
- विजय काबरा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.