‘गिरणा’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 09:03 PM2020-01-04T21:03:45+5:302020-01-04T21:04:01+5:30
वराड, ता. धरणगाव : यावर्षी गिरणा धारण शंभर टक्के भरले असून शेतकऱ्यांना यावर्षी तीन ते चार महिने पाणी मिळेल, ...
वराड, ता. धरणगाव : यावर्षी गिरणा धारण शंभर टक्के भरले असून शेतकऱ्यांना यावर्षी तीन ते चार महिने पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र परिसरातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत असून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
खरीप हंगाम पाण्यात वाहून गेला. रब्बी हंगाम चांगल्याप्रकारे येईल व कर्ज फिटेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. परंतु जानेवारी येऊनदेखील अजून गिरणा धरणाच्या पाण्याचे आवर्तन केव्हा सोडले जाईल याबाबत विश्चिती नाही. गहू, हरभरा, भुईमुग पेरण्याची मुदत संपत आहे. तरीदेखील कालव्याच्या पाण्याची अजून माहिती नाही. राष्ट्रीय महामार्गचे चौपदरी कारणाचे काम चालू आहे. परंतु कालव्याचे पाणी जाण्यासाठी पाईप न टाकल्यामुळे पाणी पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे पाणी शेतापर्यंत येईल की नाही, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे. याबाबत माहिती देऊन शेताकºयांना शेतीसाठी पाणी मिळवे, अशी मागणी होत आहे.