पावसाअभावी शेतक:यांनी पिकांवर फिरवला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2017 12:41 PM2017-07-09T12:41:18+5:302017-07-09T12:41:18+5:30

पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या.

Farmers wanting to get rain: Rotavater rotates on crops | पावसाअभावी शेतक:यांनी पिकांवर फिरवला रोटाव्हेटर

पावसाअभावी शेतक:यांनी पिकांवर फिरवला रोटाव्हेटर

Next

 ऑनलाईन लोकमत

 
अमळनेर /मुडी-बोदर्डे, जि. जळगाव, दि.9 - परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागलेली आहेत. त्यामुळे काही शेतक:यांनी उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे.
परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काही शेतक:यांनी कापूस तसेच इतर पिकांची लागवड केली. मात्र त्यानंतर पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. काही शेतक:यांनी मृगनक्षत्रातच पेरण्या पूर्ण केल्या. परंतु गेल्या  वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने, पिकांची उगवणे ही पन्नास टक्केच झाली.  पाऊसच नसल्यामुळे उगवलेली पिके सुध्दा कोमेजू लागली. त्यामुळे मुड़ी बोदर्डे येथील शेतक:यांनी  उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवला. त्यांचा बियाणे खत तसेच पेरणीचा खर्च वाया जाणार  आहे. यामुळे शेतकयाना मोठा आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे .
   पिकांवर रोटा फिरविणा:या शेतक:यांमध्ये सुनील कोळी, लोटन पाटील, तुषार पाटील, साहेबराव बडगुजर यांचा समावेश आहे. आतार्पयत 20 हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर रोटा फिरविण्यात आला आहे. दमदार पाऊस न झाल्यास बरेच शेतकरी पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmers wanting to get rain: Rotavater rotates on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.