संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचा शेतक:यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:04 PM2017-08-31T13:04:21+5:302017-08-31T13:06:31+5:30
नाराजी : 63 हजार 839 शेतक:यांनी भरले कर्जमाफीसाठी अर्ज; 130 जणांना मिळाली दहा हजारांची उचल
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 31 - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शासनाने कर्जमाफी जाहीर केली असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे सूचित केले आहे. परंतु, हे अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावरील तांत्रिक त्रुटींमुळे शेतक:यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, शेतक:यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आतार्पयत जिल्ह्यातील 63 हजार 839 शेतक:यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहे.
शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यानुसार कर्जमाफीसाठी पात्र शेतक:यांनी ऑनलाइनच नोंदणी करून कर्जमाफीसाठी अर्ज ऑनलाइनच सादर करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार आतार्पयत संकेतस्थळावर 73 हजार 326 शेतक:यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. पैकी 63 हजार 839 शेतक:यांनी कर्जमाफीसाठी प्रत्यक्षात अर्ज भरल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शपथपत्र सादर करणा:या 130 शेतक:यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर काहीसा दिलासा मिळाला. परंतु, त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी जे संकेतस्थळ दिले आहे. त्यात तांत्रिक त्रुटी येत असल्यामुळे शेतक:यांना महा ई सेवा, सीएससी सेंटर, संग्राम सेंटर येथे तासन्तास ताटळकत थांबावे लागत आहे. तरीही त्यांचे काम होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यातून पर्यायी मार्ग काढण्याची मागणी होत आहे. धुळे जिल्ह्यात महा ई सेवा केंद्र 140, सीएससी सेंटर 650, तर संग्राम सेंटर 430 असे एकूण 1,220 केंद्र आहेत. पैकी महा इ सेवाचे 86 केंद्र, सीएससी 65, संग्राम सेंटर 225 केंद्रावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रशासनातर्फे किट वाटप केले आहे.
कर्जमाफी मिळावी, यासाठी मी गेल्या 22 दिवसांपासून महा ई सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत आहे. परंतु, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे माङो कामच होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण सोडविण्यासाठी आज मला जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले.
- रामचंद्र दशरथ पाटील, शेतकरी, मोहाडी
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे शेतक:यांना अडचणी येत असून त्या सोडविण्यासाठी प्रय} सुरू आहेत.
- बी. बी. साळुंखे, जिल्हा व्यवस्थापक, सेतू केंद्र