शेतकऱ्यांना मिळणार एका अर्जात अनेक योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:14+5:302021-04-17T04:15:14+5:30

जळगाव : कृषि विभागाने आता महाडिबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या ...

Farmers will get the benefit of several schemes in one application | शेतकऱ्यांना मिळणार एका अर्जात अनेक योजनांचा लाभ

शेतकऱ्यांना मिळणार एका अर्जात अनेक योजनांचा लाभ

Next

जळगाव : कृषि विभागाने आता महाडिबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने प्रणाली विकसीत केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्र करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधारक्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्यांनी पोर्टलवर कृषी विषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला नसेल त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Web Title: Farmers will get the benefit of several schemes in one application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.