पांढऱ्या सोन्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:18 AM2018-12-18T01:18:33+5:302018-12-18T01:20:21+5:30
यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी खरीप हंगामात मागील वर्षीचा बोध घेत पुन्हा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. प्रारंभी पावसाने चांगली सुरवात केली. मात्र शेवटी उत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाही त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकºयाला बसला. एकरी दोन क्विंटलचाही उतारा आला नाही. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शेतकºयाच्या आशेवर पूर्ण पाणी फिरले. कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे तसेच अस्मानी संकट आणि बोंडअळी व लाल्याच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. अंतर्गत मशागतीसह आणि कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत नाही.
चार-पाच क्विंटलवाल्यांनी मिळेल त्या भावात दिवाळीत गरजेपोटी विकून टाकला. तेव्हाच काहींचा हंगाम संपल्यात जमा झाले, केवळ आता शेतात कापसाच्या काळ्या उभे असल्याचे चित्र आहे. त्यातच नोटा बंदीचा फटक्यात सावरा सावर करावी लागली होती. तीच स्थिती यंदाही कापसाला भाव मिळत नसल्याची आठवण शेतकºयांना झाली आहे. कमी लागवड असतानादेखील पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.
काहींनी आगामी काळात भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर ठाम असले तरी कमी प्रमाणात कापूस झालेले शेतकरीच तो विकून मोकळे झाले. शासनाच्या हमी भावाचीही वाट पाहिली नाही.
आता तर पूर्ण दीड महिन्यापासून भावात घसरण झाली आहे. सुरूवातीला सहा ते सात हजार प्रयत्न भाव होता. नंतर ५६०० जवळपास स्थिरावले. त्यातही चेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर व्यवहार चालत आहे आणि आता तर ५१००, ५२०० चे वर चढायला तयारच नसल्याने घरातच कापूस पडून आहे. सुरूवातीच्या तुलनेत भाव घसरले आहते. कापूस उत्पादक शेतकºयांना चिंता लागली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यातून शेतकºयांना सावरण्यासाठी शासनाने तत्काळ मदत केली तरच शेतकरी संकटातून बाहेर पडून सावरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.