नवीन कृषी कायद्याचा समर्थनासाठी कृषक समाज सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:46+5:302020-12-23T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे गैरसमज काढण्यासाठी राज्य कृषक समाजाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारत कृषी समाजाचे राज्याचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मंगळवारी कृषक समाजाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रगतिशील शेतकरी वसंतराव महाजन, जगतराव पाटील, ॲड. फोकमारे आदी उपस्थित होते.
डॉ. मानकर यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून, याबाबत काही जणांकडून चुकीचे गैरसमज पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजार समितीबाहेरदेखील विक्री करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी आपला माल शेतकरी देऊ शकतात. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींबाबतचे बदल शेतकऱ्यांनी सुचवावेत; मात्र हा कायदा रद्द करणे चुकीचे असून, शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मानकर यांनी दिली.