चित्तवेधक रोबोट : रेल्वे रूळास तडा गेल्याची माहिती प्रशासनास कळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 02:55 PM2018-06-16T14:55:28+5:302018-06-16T14:55:28+5:30

शिरपूर शहरातील आऱसी़पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील याने रेल्वे रूळास तडा गेल्यास त्यापूर्वी रेल्वे प्रशासनास पूर्वसूचना देणारा ‘स्मिता’ नावाचा रोबोट तयार केला आहे़.

 Fascinating Robot: The administration will know the details of the train rift | चित्तवेधक रोबोट : रेल्वे रूळास तडा गेल्याची माहिती प्रशासनास कळणार

चित्तवेधक रोबोट : रेल्वे रूळास तडा गेल्याची माहिती प्रशासनास कळणार

Next

- सुनील साळुंखे

शिरपूर : शिरपूर शहरातील आऱसी़पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील याने रेल्वे रूळास तडा गेल्यास त्यापूर्वी रेल्वे प्रशासनास पूर्वसूचना देणारा ‘स्मिता’ नावाचा रोबोट तयार केला आहे़
शिरपूर येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रोनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातून पदवीचे शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील या विद्यार्थ्याच्या संशोधनाच्या कौशल्याची दखल घेत त्याला गांधीयन यंग टेक्नोलॉजीकल इनोव्हेशन पुरस्कार जाहिर झाला आहे़
कल्पेश पाटील याच्या सेफ्टी मॉंनिटरिंगइन ट्रेन अप्लिकेशन (स्मिता) या संशोधनाला नामांकन प्राप्त झाले आहे. सोसायटी फॉर रिसर्च एन्ड इनिशियेटीव्ह फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीस अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूशन द्वारे दरवर्षी अभियांत्रिकी, विज्ञान, कृषी, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे होणाऱ्या संशोधन व उद्योजक उत्सव दरम्यान पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी कल्पेशला नामांकन मिळाले आहे. या अप्लिकेशन मधील संशोधनाने के.पी.आय.टी.स्पार्कल पुणे व भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे आयोजित हेंकेथोंन २०१८ साठी विशेष सहभाग नोंदवला होता. त्यास या यशासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या कल्पना कणाकरी ब्रम्हांडाचा भेद करी या बोधवाक्यातून प्रेरणा मिळाली आहे. त्यास प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्या डॉ.पी.जे.देवरे, प्रा.स्मितल पाटील रोहित, आसापुरे, धनश्री महाजन, कामना भदाणे, जयेश बारी, दिव्यांनी राजपूत यांचे सहकार्य मिळाले.
रेल्वे रूळाला तडा व रूळा खालची खडी खचल्याने दरवर्षी अनेक अपघात होतात. यामध्ये अनेक लोक जखमी तर अनेक मृत्युमुखी पडतात. या घटनेमुळे जीवितहानी व वित्तहानी होणेस प्रतिबंधबसावा म्हणून ‘स्मिता’ या रोबोटची निर्मिती केली. या रोबोट तयार करण्यासाठी इन्फोरेड व अल्ट्रासोनिक सेन्सर, कॅमेरे तसेच जी.पी.एस.तंत्रज्ञानाचा वापर केला असून याचे मापक रेल्वे कंट्रोल रूमला रोबोटमध्ये स्थित आधुनिक उपकरणाच्या माध्यमाने माहिती कळविली जाणार आहे. यात ‘स्मिता’ची सर्व कार्यप्रणाली ही सौर उर्जेवर चालणार आहे.
कल्पेशच्या कल्पक बुद्धीतून सुचलेल्या कल्पनांना अनेक शुभेच्छासह त्याच्या हातून देशाच्या विकासात भर घालणाºया भारतीय रेल्वेत नवीन शोध होऊन रेल्वेच्या विकासात कल्पेशचा हातभार लाभो...अश्या प्रकारच्या शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, डॉ.पी.जे.देवरे यांनी दिल्यात़
कल्पेश भागवत पाटील हा मूळचा जळगावचा असून त्याचे वडील भागवत बारकू पाटील हे एका कंपनीत कामाला आहे तर आई गृहिणी आहे.

Web Title:  Fascinating Robot: The administration will know the details of the train rift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.