कोरपावली येथे रस्ता दुरुस्तीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:06 PM2018-12-24T16:06:53+5:302018-12-24T16:08:34+5:30

यावल-कोरपावली रस्ता दुरुस्ती आणि काटेरी झुडपे काढण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेले कोरपावलीचे सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थ यांचे बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाने काम सुरू केल्याने मागे घेण्यात आले.

The fast-moving fastdown to Corpavali is finally back | कोरपावली येथे रस्ता दुरुस्तीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर मागे

कोरपावली येथे रस्ता दुरुस्तीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर मागे

Next
ठळक मुद्देरविवारची सुटी असतानाही अधिकारी उपोषण स्थळीजिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांची मध्यस्थीदोन दिवसात रस्त्याचे काम सुरु करणार

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल-कोरपावली रस्ता दुरुस्ती आणि काटेरी झुडपे काढण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेले कोरपावलीचे सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थ यांचे बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाने काम सुरू केल्याने मागे घेण्यात आले.
यावल ते कोरपावली विरावली मार्गे आणि यावल ते कोरपावली सूतगिरणी मार्गे हा रस्ता नवीन व्हावा आणि दोन्हींकडील रस्त्याची काटेरी झुडपे काढण्यात यावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग यावल यांच्या कार्यालयाच्या बाजूला २२ डिसेंबरपासून उपोषण सुरू केले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी निंबाळकर यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती, परंतु सुतगरणी मार्गे कोरपावली जाणारा रस्ता हा जि.प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तेथे पाठवले. सोनवणे यांच्या मध्यस्थीने उपोषण सुटले. कनिष्ठ अभियंता आर.पी. इंगळे व युवानेते संदीप प्रभाकर सोनवणे यांनी निंबूपाणी देऊन सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थांंना दोन दिवसात सूतगिरणी मार्गे कोरपावली रस्त्याचेसुद्धा काम सुरु करू, असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले .
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष कदीरखान, कोरपावलीचे उपसरपंच प्रतिनिधी इस्माईल तडवी, ग्रा.पं. सदस्य सरफराज तडवी, पुष्पा भालेराव, संदीप बरसू नेहेते, नगरसेवक अस्लम शेख, मनोहर सोनवणे, युवक काँग्रेस अध्यक्ष आलिमभाई शेख, अनिल जंजाले, कोरपावलीचे अन्सार पटेल, वसीम तडवी, शरद भालेराव, सचिन भालेराव, प्रवीण भालेराव, मोहरल्याचे राजेंद्र महाजन, विरावलीचे नानाजी पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, विनोद पाटील, कोरपावलीचे तलाठी तायडे, कय्युम पटेल, अमोल तायडे आदी उपस्थित होते.

Web Title: The fast-moving fastdown to Corpavali is finally back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.