चोपड्यात तंत्रनिकेतन शिक्षकाचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:21 PM2019-09-15T23:21:26+5:302019-09-15T23:21:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरचचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतनमधील विकास हिम्मत पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरचचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतनमधील विकास हिम्मत पाटील या शिक्षकाने १३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या अन्यायाविरुद्ध व प्रचार्यांनी केलेल्या बेकायदेशीर सेवासमाप्तीच्या विरोधात तसेच थकीत वेतानासाठी चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे उपोषण सुरू आहे. रविवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले.
उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने चक्कर येऊन विकास कोसळले. पोलिसांनी अॅम्बुलन्स मागवून त्यांंना रुग्णालयात अॅडमिट होण्यास सांगितले. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे सांगितले.