पाडळसे धरणाच्या कामासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 06:30 PM2019-02-19T18:30:24+5:302019-02-19T18:31:15+5:30
अमळनेर : पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू व्हावे यासाठी पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू ...
अमळनेर : पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू व्हावे यासाठी पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
समितीने छत्रपती शिवाजी नाट्यगृहासमोर शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला अभिवादन करून कलशयात्रा काढण्यात आली. तहसील कचेरीपर्यंत कलशयात्रा पोहचल्यानंतर तेथे तापी मातेची आरती करून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, सुकाणू समिती सदस्य एस. बी. पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रा. सुनील पाटील, प्रा.डी. डी. पाटील, व. ता. पाटील, आर. बी. पाटील, महेश पाटील, रवींद्र पाटील, अजय पाटील, प्रा. सुभाष पाटील, डी. एम. पाटील, एस. एम. पाटील, योगेश पाटील, उमाकांत नाईक, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, शांताराम ठाकूर, देविदास देसले, सतीश काटे, रामराव पवार, पुरुषोत्तम शेटे, श्रावण पाटील, एन. के. पाटील साखळी उपोषणाला बसले. माजी आमदार साहेबराव पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, विक्रांत पाटील, नगरसेवक मनोज पाटील, निशांत अग्रवाल, अभिषेक पाटील , अॅड आर. एल. बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष योजना पाटील, साई सेवा समिती आदींनी पाठिंबा दिला.
२० रोजी मराठा समाज महिला मंडळाच्या महिला उपोषणास बसणार आहेत.