भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमितांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:50 PM2018-11-27T23:50:30+5:302018-11-27T23:51:52+5:30
भुसावळ , जि.जळगाव : रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील झोपडपट्टीचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढल्यानंतर विस्थापित झालेल्यांना सर्वे क्रमांक ६३/१ ...
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील झोपडपट्टीचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढल्यानंतर विस्थापित झालेल्यांना सर्वे क्रमांक ६३/१ ही जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे, त्याऐवजी शहरातील विविध गटातील मोकळी जागा मिळावी यासाठी अतिक्रमितांंचे प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुसºया दिवशीही सुरूच होते.
६१/१ या जागेएवजी अतिक्रमणधारकांना शहरातील सर्वे क्रमांक १८१, १८२, १८३, १९१, १९२ यावरील बखळ जागेवर पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन प्रांत डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना शिष्टमंडळाने दिले.
२६ रोजी दिलेल्या निवेदनाच्या प्रत्युत्तरात प्रांत कार्यालयातून उपोषणार्र्थींना ठोस आश्वासन मिळाले नाही. उपोषणाला आठ जण बसले आहे. त्यांना प्रभावित नागरिकांनी तसेच मनसे व भारिप यांनी पाठिंबा दिला आहे.
आज दुपारी निदर्शने
माजी उपनगराध्यक्ष मोहन निकम, राजू डोंगरदिवे, शेख इस्माईल शेख इसाक, शे अजगर शेख कादर हे २८ रोजी दुपारी १२ वाजेपासून निदर्शने करणार आहे.