हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:51 PM2018-11-22T21:51:20+5:302018-11-22T21:54:08+5:30

हिंगणे बुद्रुक ग्रामपंचायतच्या गैरकारभाराविषयी उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या गैरकारभाराची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या व इतर मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे.

Fasting for inquiry of Hingoon Budruk water scheme | हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण

हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय पेयजल योजनेत झाला गैरव्यवहारप्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कारवाईची मागणीतीन दिवसांपासून सुरु आहे उपोषण

नेरी ता.जामनेर : हिंगणे बुद्रुक ग्रामपंचायतच्या गैरकारभाराविषयी उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या गैरकारभाराची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या व इतर मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे. शुक्रवारी उपोषणाचा चौथा दिवस आहे.
हिंगणे बुद्रुक गावात साधारण आठ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर होऊन कार्यान्वित झाली होती. मात्र तेव्हा पासून गावातील ग्रामस्थांना या योजनेतून आज पर्यंत पाणी मिळाले नाही. शासनाचा या योजनेवर अनाठायी खर्च झाल्याचा आरोप उपोषणकर्ते अरुण भास्कर पाटील यांनी केला आहे. याबाबत वर्क आॅर्डर, योजनेचे अंदाजपत्रक, टेंडर प्रत, कामाचा कालावधी, लेबर लायसन्स, विमा, पी.एफ, काम पूर्ण झाल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व आॅडिट रिपोर्ट या विषयी सविस्तर माहिती तसेच या योजनेचा ठेकेदार हा कोण आहे याबाबत सविस्तर माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता एस. आर. चव्हाण यांनी याठिकाणी भेट देऊन उपोषण कर्त्यांची मागणी समजावून घेतली.

Web Title: Fasting for inquiry of Hingoon Budruk water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.