बोदवडमध्ये महाविकास आघाडीतर्फे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:00 IST2020-12-08T13:59:51+5:302020-12-08T14:00:16+5:30
बोदवडमध्ये महाविकास आघाडीतर्फे उपोषण करण्यात आले.

बोदवडमध्ये महाविकास आघाडीतर्फे उपोषण
बोदवड : शेतकरी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारलेल्या भारत बंद’मध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीकडून ‘बोदवड बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्याला बोदवड शहरातून प्रतिसाद मिळाला.
बोदवड शहर सकाळपासूनच कडकडीत बंद होते, तर महाविकास आघाडीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मंडप टाकून लाक्षणिक उपोषणासह घोषणा देण्यात आल्या, तर तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.
आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांचे तालुक्यातील राजकीय मंडळी सहभागी झाली होती.