उमविच्या पदवीधर गटाच्या ३२ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:15 PM2018-01-20T16:15:09+5:302018-01-20T16:16:47+5:30

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे.

The fate of 32 candidates of UG's graduate group will be closed today in the polling booth | उमविच्या पदवीधर गटाच्या ३२ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

उमविच्या पदवीधर गटाच्या ३२ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

Next
ठळक मुद्दे१० जागांसाठी २३ हजार ७३७ मतदार करणार मतदान तीरंगी लढत असल्याने रंगत४०० पेक्षा अधिक कर्मचारी या मतदानiसाठी नियुक्त

आॅनलाईन लोकमत

जळगाव-उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रात ६८ बुथवर मतदान घेण्यात येणार असून, ३२ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान पेटीत बंद होणार आहे.

या निवडणूकीसाठी शनिवारी विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. त्यांना कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील यांनी निरोप दिला. बसेसद्वारे मतपेटया व मतदानाचे साहित्य घेवून हे कर्मचारी रवाना झाले. रविवार सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही मतदानाची वेळ असून एकूण ४०० पेक्षा अधिक कर्मचारी या मतदान कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. नऊ विभागीय अधिकाºयांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. काही केंद्रावर बैठेपथक कार्यरत राहिल.

२३ हजार ७३७ मतदार करतील मतदान

१० जागांसाठी खान्देशातून २३ हजार ७३७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. २६ केंद्रावर मतदान होणार असून जळगाव जिल्ह्यात १५, धुळे मध्ये ६ तर नंदुरबार जिल्ह्यातील ५ केंद्रावर मतदान होणार आहे. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात मतमोजणीला प्रारंभ होईल.

काट्याची लढत होण्याची शक्यता

पदवीधर गटासाठी तिरंगी लढत रंगणार असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यापीठ विकास मंच, सर्वपक्षीय नेत्यांचे विद्यापीेठ विकास आघाडी व विद्यापीठ परिवर्तन पॅनलमध्ये लढत असून, चार अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. तिन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काट्याची लढत रंगण्याची शक्यता आहे.

Web Title: The fate of 32 candidates of UG's graduate group will be closed today in the polling booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.