सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु होवूनही शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:04 PM2019-12-11T13:04:27+5:302019-12-11T13:05:04+5:30
८ टक्क्यांंपेक्षा कमी आर्द्रता असल्यासच हमीभाव : जिनर्सने थांबवली खरेदी
जळगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अडचणी संपता संपत नाहीय, आधी अवकाळी पावसामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर आता बाजारात हमीभाव देखील मिळत नसल्याने शेतकºयांची नशिबी निराशाच हाती आली आहे. सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकºयांना हमीभाव मिळेल अशी अपेक्षा असताना , या केंद्रावर शेतकºयांना मोठ्या प्रमाणात निकष पाडावे लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव केवळ कागदावरच मिळत आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर कापसाला हमी भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी मेळकुटीस आले आहेत. आधीच सीसीआय ने खरेदी केंद्र उशीराने सुरु केल्यामुळे शेतकºयांना आपला माल खासगी व्यापाºयांना हमीभावापेक्षा तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने विक्री करावा लागला. आता सीसीआयने खरेदी सुरु केली असली तरी तीन प्रकारच्या निकषांना शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे. ज्या शेतकºयांचा कापसात ८ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता आहे. अशा शेतकºयांनाच हमीभावाप्रमाणे ५ हजार ५०० रुपये इतका भाव मिळत आहे. ८ ते १२ टक्क्यांदरम्यान आर्द्रता असलेल्या कापसाला ५ हजार ३५० इतका भाव दिला जात आहे. तर १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस सीसीआयकडून खरेदी केला जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शेतकºयांना विश्वासात घेतले जात नाही
कापसाचे निकष ठरविताना शेतकºयांना पुर्णपणे विश्वासात घेतले जात नसल्याची खंत शेतकºयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. सीसीआयचे अधिकारी मनाप्रमाणे आर्द्रतेचे प्रमाण निश्चित करत असून, यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस सीसीआय खरेदी करत नाहीय, त्यामुळे ४५०० रुपये प्रतीक्विंटल दराने शेतकºयांना खासगी व्यापाºयांना कापूस विक्री करावा लागत आहे.
आतापर्यंत दोन लाख गाठींची खरेदी
अवकाळी पावसामुळे कापसाचे उत्पादन उशीराने होत आहे. डिसेंबर महिन्यात नेहमी संपुर्ण खान्देशात ३ ते ४ लाख गाठींची खरेदी होवून जाते. यंदा मात्र कापूस वेचणी उशीराने झाल्यामुळे ४ डिसेंबरपर्यंत संपुर्ण खान्देशात दीड लाख गाठींची खरेदी झाली असल्याची माहिती खान्देश जिनीग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यंदा खान्देशात कापसाची लागवड चांगली झाल्यामुळे उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अवकाळीमुळे उत्पादनात एक ते दीड लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे.
९० टक्के जिनर्सने खरेदी थांबवली
सीसीआयकडून चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांचा भर सीसीआयच्याच केंद्रावरच आहे. ज्यांचा माल सीसीआय खरेदी करत नाही असेच शेतकरी खासगी व्यापाºयांकडे जात आहे.
खासगी व्यापाºयांना देखील ५ हजार रुपयांमध्ये माल खरेदी करणे परवडत नसल्याने खासगी जिनर्सने खरेदी थांबवली आहे. निर्यात देखील थांबली असल्यामुळे स्पीनींग उद्योगात देखील मंदी आहे. त्यामुळे खासगी व्यापाºयांकडून कापूस खरेदी थांबविण्यात आल्याची माहिती जिनर्स हर्षल नारखेडे यांनी दिली.
जिनर्स, सीसीआयचेही साटेलोटे
सीसीआयने १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस खरेदी करणे जवळपास बंद केले आहे. काही केंद्रावरच हा कापूस खरेदी केला जात आहे. ज्या ठिकाणी जास्त आर्द्रता असलेला कापूस सीसीआयच्या केंद्रावर खरेदी केला जात नाही, अशा ठिकाणी शेतकºयांना नाईलाजास्तव ४३०० ते ४५०० रुपये क्विंटल दराने खासगी व्यापारी किंवा जिनर्सला माल विक्री करावा लागत आहे. मात्र, जिनर्स व व्यापाºयांनी काही ठिकाणी सीसीआयशी लागेबांधे करत शेतकºयांकडून कमी भावात घेतलेला माल ५ हजार रुपये क्विंटल दराने सीसीआयला विक्री केला जात असल्याचे काही शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी शासन व व्यापाºयांची मिलीभगत व नियमांमुळे त्रस्त झाला आहे.
शेतकºयांना दरवर्षी शासन हमीभाव निश्चित करते. प्रत्यक्षात मात्र शेतकºयांना हमीभाव मिळतच नाही. अनेक अटी व शर्ती लावल्यामुळे सीसीआय हमीभावात माल खरेदी करत नाही. यंदा पाऊस जास्त असल्याने कापसात १० टक्के ओलावा तर राहणारच आहे. मात्र, सीसीआय किंवा शासनाकडून शेतकºयांना कोणतीही सवलत दिली जात नाही.
-भास्कर खंडू पाटील, आडगाव, ता.चोपडा
कापूस उत्पादक शेतकºयांना आधीच अवकाळी पावसाने अडचणीत आणले आहे. शासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच कापसाला हमीभावाएवढी रक्कम देखील मिळत नसल्याने शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम देखील वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
-दिलीप पंढरीनाथ चौधरी, आव्हाणे, ता.जळगाव