बालाजी पेठेत पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:27 PM2020-06-13T23:27:00+5:302020-06-13T23:32:24+5:30

जुन्या वादातून हल्ला : खाजगी रूग्णालयात उपचार

A father and daughter were stabbed to death in Balaji Peth | बालाजी पेठेत पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार

बालाजी पेठेत पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार

Next

जळगाव : जुन्या वादातून तीन ते चार जणांनी घरात घुसून पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बालाजी पेठेत घडली.सतिष शर्मा व राधिका शर्मा असे जखमी पिता-पुत्रीचे नाव असून दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
जखमींनी दिलेली माहिती अशी की, बालाजी पेठेत कैलास मदनलाल तिवारी वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून रवीकुमार बद्रीनारायण शर्मा हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कैलास तिवारी व त्याचे नातेवाईक रवीकुमार यांच्याची वाद घालत होते़ तर त्यांच्यातील घर खाली करण्याचा वादही न्यायप्रविष्ठ आहे़ दरम्यान, अधून-मधून रवीकुमार बालाजी पेठेतच राहत असलेले लहान भाऊ सतिष शर्मा यांच्याकडे जेवणासाठी जातात. शनिवारी रात्री सुध्दा तेथे गेले होते. परंतु, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कैलास तिवारी, सत्यनारायण तिवारी, रोहित कांतीलाल तिवारी, राहुल तिवारी हे अचानक सतिष शर्मा यांच्या घरी आले व त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यातील एकाने सतिष शर्मा यांच्याव तीक्ष्ण हत्याराने चेह-यावर वार केला.नंतर त्यांची मुलगी राधीका हिच्यावरही वार केला़ त्यामुळे दोघांच्या चेहºयावर रक्तस्त्राव होवून जखमी झाले़ त्यानंतर हल्लेखोरांना तेथून पळ काढला.

पोलीस ठाण्यात घेतली धाव
सतिष शर्मा व त्यांच्या मुलीने जखमी अवस्थेत शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंतर पोलिसांनी दोघांना वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. तर पोलिसांनीच दोघांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री खाजगी रूग्णालयाबाहेर नातेवाईकांची चांगलीच गर्दी झालेली होती़ याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे़ जखमी पिता-पुत्रीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: A father and daughter were stabbed to death in Balaji Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.