पिता-पुत्राने केले एकाच वेळी प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:31+5:302021-05-07T04:17:31+5:30
लोकमत न्युज नेटवर्क जळगाव : श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाज व लायन्स क्लब यांच्या वतीने ४ मे रोजी लायन्स ...
लोकमत न्युज नेटवर्क
जळगाव : श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाज व लायन्स क्लब यांच्या वतीने ४ मे रोजी लायन्स हॉल येथे रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विजयकुमार वर्मा व निखिल वर्मा या पितापुत्राच्या जोडीने प्लाझ्मा दान केले.
यावेळी शहर अध्यक्ष ॲड. के.बी.वर्मा, जिल्हा अध्यक्ष व लायन्स प्रेसिडेंट पन्नालाल वर्मा व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रक्तदानाचे महत्व दिलीप चौबे व अशोक जैन यांनी सांगितले.
यांनी केले रक्तदान
या शिबिरात समाजाचे वरिष्ठ सदस्य जवरीलाल वर्मा व पंकज वर्मा, धर्मेंद्र सोनी व डॉ. शिवम वर्मा, शुभम वर्मा, गणेश वर्मा, रामानंद वर्मा, दीपक वर्मा, ओम वर्मा, किशोर वर्मा, कैलास वर्मा, जितेंद्र वर्मा, विजय वर्मा, नितीन वर्मा, गणेश सहदेव, नीरज वर्मा, पंकज वर्मा आदींनी रक्तदान केले.
आतापर्यंत ५० वेळा केले रक्तदान
शिबिरामध्ये विजयकुमार वर्मा व त्यांचा मुलगा निखिल यांनी एकाच वेळी प्लाझ्मा दान केले. विजयकुमार वर्मा यांनी आत्ता पर्यंत ५० वेळा रक्तदान केले आहे. कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहनही त्यांनी व शहर अध्यक्ष ॲड. के. बी. वर्मा यांनी केले. या प्रसंगी रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी, सचिव सुरज वर्मा , कोषाध्यक्ष किशोर वर्मा व जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, मनीष वर्मा व दीपक वर्मा उपस्थित होते.