चक्क कुरिअरने मागविली तलवार अमळनेरात पिता-पुत्राला अटक

By संजय पाटील | Published: June 19, 2023 08:07 PM2023-06-19T20:07:53+5:302023-06-19T20:08:10+5:30

विचारपूस केली असता त्याने वडील सादिक यांच्या नावाने कुरिअरने तलवार मागविल्याचे सांगितले.

Father and son were arrested in Amalner, sword ordered by the courier | चक्क कुरिअरने मागविली तलवार अमळनेरात पिता-पुत्राला अटक

चक्क कुरिअरने मागविली तलवार अमळनेरात पिता-पुत्राला अटक

googlenewsNext

संजय पाटील/ अमळनेर (जि. जळगाव) : कुरिअरने तलवार मागविणाऱ्या गांधलीपुरा भागातील पिता-पुत्राला रंगेहात पकडून अटक केली. हा प्रकार सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

सादिक सुपडू खाटीक (वय ४७) आणि अदनान सादिक खाटीक (१९, रा. लक्ष्मी टॉकीज मागे, अमळनेर) अशी या पिता-पुत्राची नावे आहेत.
शहरात गेल्या आठवड्यात तणावग्रस्त परिस्थिती आहे. अशात शहरात एकाने कुरिअरने तलवार मागविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुपारी अर्बन बँकेजवळ नाकाबंदी लावली. त्यावेळी अदनान हा दुचाकीवर गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला.

विचारपूस केली असता त्याने वडील सादिक यांच्या नावाने कुरिअरने तलवार मागविल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अदनान याची मोटारसायकल आणि भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख १२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेड कॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Father and son were arrested in Amalner, sword ordered by the courier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव