सव्वा वर्षात वडील व दोन भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:17 AM2021-05-12T04:17:03+5:302021-05-12T04:17:03+5:30

जळगाव : आजारपणामुळे वडील व भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अवघ्या सव्वा वर्षातच दुसऱ्या एका भावानेही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या ...

Father and two brothers die in 15 years | सव्वा वर्षात वडील व दोन भावांचा मृत्यू

सव्वा वर्षात वडील व दोन भावांचा मृत्यू

Next

जळगाव : आजारपणामुळे वडील व भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अवघ्या सव्वा वर्षातच दुसऱ्या एका भावानेही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी खोटेनगर रेल्वे रुळावर घडली. हितेंद्र प्रेमकांत कुलकर्णी (४७, रा. खोटेनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर न्यायालयात नोकरीला असलेले हितेंद्र हेमकांत कुलकर्णी हे आई, पत्नी व दोन मुलींसह खोटेनगरात वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास हितेंद्र यांनी खोटेनगरजवळील रेल्वे रुळावर रेल्वेखाली आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अंगझडतीत त्यांना हितेंद्र यांचे ओळखपत्र आढळून आल्याने त्यांची ओळख पटली. त्यानंतर पंचनामा करून त्यांचा मृतदेह सायंकाळी शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशा घडल्या मृत्यूच्या घटना

गेल्यावर्षी २६ जानेवारी रोजी हितेंद्र यांच्या लहान भावाचे निधन झाले होते. त्यानंतर १७ मे रोजी वडिलांचे अकस्मात निधन झाले, तर मार्च महिन्यात त्यांच्या काकांचेदेखील निधन झाले. दरम्यान, आता हितेंद्र यांनी आत्महत्या केल्याने कुलकर्णी कुटुंबावर मोठा आघात कोसळला.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कार्यालयांत १५ टक्के उपस्थितीचे आदेश असल्याने हितेंद्र हे घरीच होते. हितेंद्र यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्‍चात आई, भाऊ, पत्नी दोन मुली असा परिवार आहे. ॲड. सुधीर कुलकर्णी यांचे ते बंधू होत.

Web Title: Father and two brothers die in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.