मारहाण केल्याप्रकरणी पिता-पुत्रास सक्तमजुरी

By admin | Published: January 17, 2017 12:54 AM2017-01-17T00:54:06+5:302017-01-17T00:54:06+5:30

झाडी येथील घटना : अमळनेर न्यायालयाचा निकाल

Father-son-in-law's right-wing | मारहाण केल्याप्रकरणी पिता-पुत्रास सक्तमजुरी

मारहाण केल्याप्रकरणी पिता-पुत्रास सक्तमजुरी

Next

अमळनेर : उसनवार दिलेले पैसे परत मागण्याचा राग आल्याने झाडी येथे दोघांनी एकास पोटात मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी आरोपी पिता-पुत्रास न्यायाधीश वहाब सैयद यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोमवारी सुनावली.
 रवींद्र आत्माराम पाटील  (रा.झाडी) यांनी त्यांच्या वडिलांनी उसनवार दिलेले पाच हजार रुपये अंबालाल ङिांगा पाटील, हेमंत अंबालाल पाटील (रा.झाडी) यांच्याकडे परत मागितले होते. त्याचा राग आल्याने दोघांनी त्यास पोटात लाथाबुक्क्यांनी तसेच जोडय़ांनी मारहाण केल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी मारवड पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोघांविरुद्ध भादंवि 325, 504, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास हेड कॉन्स्टेबल रमेश पाटील यांनी केला होता.
या खटल्याची सुनावणी अमळनेर येथील कनिष्ठ न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अॅड.रामभाऊ शिंदे, प्रदीप भट यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश वहाब सैयद यांनी पिता-पुत्रास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच रवींद्रच्या आईला दोन हजार रुपये आरोपींनी द्यावे अन्यथा एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.   
        (वार्ताहर)

Web Title: Father-son-in-law's right-wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.