दोन मुलींसह पित्याने घेतली रेल्वेखाली उडी, पित्याचा जागीच मृत्यू, पाळधी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:54 PM2018-01-06T12:54:35+5:302018-01-06T12:54:49+5:30
दोन्ही चिमुरडींची मृत्यूशी झुंज
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 06- कौटुंबिक वादातून महेंद्र उर्फ बाळू गुलाब कोळी (वय 32, रा.पाळधी,ता.धरणगाव) या पित्याने श्रध्दा (वय 5) व दिव्या (वय 3) या दोन मुलींसह धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. त्यात महेंद्र याचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता पाळधी येथे ही घटना घडली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महेंद्र उर्फ बाळू हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आई, प}ी व दोन मुलींसह तो पाळधी येथे वास्तव्याला होता. गेल्या दोन दिवसापासून कुटुंबात वाद सुरु होता.गुरुवारी सायंकाळीही घरात टोकाचा वाद झाला. शुक्रवारी दुपारी याच वादातून बाळू याने श्रध्दा व दिव्या या दोन्ही मुलींना कडेवर घेत थेट रेल्वे रुळ गाठले. रेल्वे गाडीची प्रतिक्षा करीत तेथे थांबला.धरणगावकडून भुसावळकडे जाणारी माल गाडीजवळ येताच दोन्ही मुलींसह त्याने रेल्वेखाली झोकून दिले. हा प्रकार लक्षात येताच चालकाने तत्काळ गाडी थांबविली तर गेटमन व अन्य कर्मचा:यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तोर्पयत त्याचा मृत्यू झालेला होता.
दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात
रेल्वे कर्मचारी व लोकांनी घटनास्थळी धाव घेतली असता दिव्या व श्रध्दा या दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. लोकांनी त्यांना तत्काळ गावातील दवाखान्यात दाखल केले. जि.प.सदस्य प्रताप पाटील यांना रुग्णवाहिकेसाठी रेल्वे कर्मचा:याचा फोन आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका रवाना करुन जखमी मुली दाखल असलेल्या ठिकाणी धाव घेतली. तेथे मुलींची ओळख पटत नव्हती. नंतर त्यांच्या गल्लीतील एका तरुणाने या मुलींना ओळखले. त्यांना लागलीच तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले तर नंतर मृत महेंद्र यालाही रुग्णालयात आणले. दीड महिन्यापूर्वीच झाले होते दुसरे लगA महेंद्र याची प}ी लता हिचा सहा महिन्यापूर्वी पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे.
प}ीच्या मृत्यूनंतर लहान मुलींची चिंता असल्याने महेंद्र याने प}ीची लहान बहिण ममता हिच्याशी दीड महिन्यापूर्वीच विवाह केला होता. या विवाहाच्या कारणावरुनच कुटुंबात वाद सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. महेंद्र याच्या वडिलांचे निधन झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर महेंद्रच्या भावाची प}ी व बहिणीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. चिमुरडय़ांची अवस्था पाहता त्यांनी प्रचंड आक्रोश केला.
दिव्या व श्रध्दा या दोन्ही मुलींच्या डोक्याला व मेंदूला जबर मार लागला आहे. दोन्ही मुली बेशुध्द असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी साकेगाव येथील गोदावरी रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले. मयत महेंद्र हा रिक्षा चालक होता. स्वत:च्या मालकीच्या दोन रिक्षा आहेत. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.