मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना पिता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:55 PM2018-04-29T12:55:02+5:302018-04-29T12:55:02+5:30

भुसावळ ते वरणगाव दरम्यानची घटना

Father was killed when he returned after distributing a child's marriage magazine | मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना पिता ठार

मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना पिता ठार

googlenewsNext
ठळक मुद्दे के.सी. पार्क परिसरातील रहिवासीपरिसरात शोककळा

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना झालेल्या अपघातात पांडुरंग पोपट कोळी (६५, रा. के.सी. पार्क परिसर, कानळदा रोड) हे ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी भुसावळ ते वरणगाव दरम्यान घडली. अवघ्या १० दिवसांवर मुलगा गणेश याचे लग्न आले असताना पित्याचा मृत्यू झाल्याने के.सी. पार्क परिसरात शोककळा पसरली आहे.
भगीरथ शाळेचे निवृत्त शिक्षक असलेले पांडुरंग कोळी यांचा मुलगा गणेश कोळी याचे ८ मे रोजी लग्न आहे. मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी पांडुरंग कोळी शनिवारी मुक्ताईनगर येथे गेले होते. परत येत असताना वरणगाव ते भुसावळ दरम्यान मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली व ते खाली कोसळले. तब्बल तासभर ते रस्त्यावर पडून असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
अखेर या संदर्भात कोळी यांचे जावई पो.कॉ. विजय सोनवणे यांना फोन आला व ते घटनास्थळी पोहचले आणि कोळी यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घरात लग्नाची सर्व तयारी
मुलाच्या लग्नाची घरात सर्व तयारी झाली असून बस्तादेखील काढण्यात आला आहे. तसेच आवश्यक सर्व गोष्टींचे बुकिंगही झाले आहे. घरात सर्व लग्नाची तयारी सुरू असताना वर पित्यावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Father was killed when he returned after distributing a child's marriage magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.