पित्याचा मृतदेह घरी; कन्या सरस्वती दरबारी
By admin | Published: March 3, 2017 12:20 AM2017-03-03T00:20:47+5:302017-03-03T00:20:47+5:30
फैजपूर : हुंदके देत रियाने सोडविला बारावीचा पेपर, धनाजी नाना महाविद्यालय परीक्षा केंद्रावर गहिवर
फैजपूर-पित्याचे कलेवर घरात पडले असताना रिया बारेला हिने बारावी या जिवनातील महत्त्वाच्या टप्प्यावरील परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर दिला. तिने हा निर्णय मोठय़ा हिमतीने व दु:खाचा घोट पिऊन घेतला. तिला त्यासाठी घरचे व शिक्षकांनी धीर दिला. परीक्षा काळात हुंदके देत तिने पेपर लिहिला. परीक्षा काळात परीक्षा केंद्रावरील वातावरण वेदनादायी होते.
पित्याचा मृतदेह घरात असताना कन्या रिया हिने सरस्वतीच्या दारी अर्थात परीक्षा सभागृहात जाऊन आपल्या भावी जीवनासाठी वळण देणा:या माय मराठीचा बारावीचा पेपर हुंदके देत सोडविला. गुरुवारी या दु:खद घटनेने फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सर्वाचेच मन गहिवरून आले.
शहरातील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणा:या रिया राजू बारेला या विद्यार्थिनीचा गुरुवारी सकाळी 11 वाजता धनाजी नाना महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर होता, मात्र पेपर सोडविण्याच्या आधीच रिया हिला अतिशय दु:खद व कठीण पेपर सोडविण्याचा प्रसंग आला. सकाळी 10 वाजता सावदा रोडवरील मल्हार कॉलनीत राहणारे रिया हिचे वडील राजू बारेला (वय 45) यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.
राजू बारेला हे मूळ अडावद येथील रहिवासी व ते ािस्ती धर्मगुरू म्हणून धर्माचा प्रचार व प्रसार सोबतच समाजसेवेचे कार्यसुद्धा करीत होते. ते गेल्या वर्षभरापासून आजारी होते व त्यातच त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.
रियासमोर मोठा कठीण प्रसंग होता मात्र नातेवाईक व शिक्षकांनी तिला धीर देत आयुष्याला वळण देणा:या मराठीचा पेपर सोडविण्याचा सल्ला दिला.
वडिलांचा मृतदेह घरात असताना रिया हिने अतिशय गंभीर मनाने परीक्षा केंद्रावर जात हुंदके देत मराठीचा पेपर सोडविला व दुपारी दीड वाजेच्या सुमारास जवळच असलेले घर गाठले.
या वेळी रियासोबत सर्वाचाच आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. राजू बारेला यांच्यावर भुसावळ येथे ािस्ती धर्मानुसार सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगा असा परिवार आहे.