जळगावात मुलाच्या विरहात पित्याचा आत्महत्येचा प्रय}
By admin | Published: July 1, 2017 11:38 AM2017-07-01T11:38:58+5:302017-07-01T11:38:58+5:30
कल्याणीनगरातील घटना : मुलगा देवांश भदाणेला 19 एप्रिल रोजी चिरडले होते वाळूच्या डंपरने
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1 - वाळू वाहतूक करणा:या डंपरने मुलाचा बळी घेतल्याचे दु:ख सहन होत नसल्याने त्याच्या विरहात कैलास दगडू भदाणे (वय 32 रा.कल्याणीनगर, जळगाव) या पित्यानेही शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला. वेळीच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
देवांश कैलास भदाणे (वय 3 रा.कल्याणीनगर, जळगाव) या मुलाला 19 एप्रिल रोजी वाळूने भरलेल्या डंपरने चिरडले होते. जिल्हा रुग्णालयात त्याला बाटलीतून दूध व पाणी पाजण्यात आले होते. तेथेही तो बोलला, मात्र, कमरेपासून खाली शरीरच शिल्लक न राहिल्याने तासाभराने त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करून पेटविण्याचा प्रय} केला. याप्रकरणी डंपरचालकाला अटकही झाली होती. तर मानवाधिकार आयोगानेही त्याची दखल घेऊन जिल्हाधिका:यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. देवांश हा अर्चना व कैलास दगडू भदाणे यांचा एकुलता एक मुलगा होता.
ओढणी तुटल्यामुळे वाचला जीव
देवांशच्या मृत्यूनंतर कैलास त्यांची प}ी अर्चना दोघंही तणावात आहेत. घरातील कुटुंब त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रय} करतात. शुक्रवारीही प}ी कांचननगरातील नातेवाइकांकडे गेली असता घरात कोणी नसल्याचे पाहून कैलास यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. ही ओढणी तुटल्याने त्याचा आवाज बाहेर आला. काय झाले म्हणून गल्लीतील लोक पाहायला आले असता कैलासने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, कैलास यांची प्रकृती धोक्याबाहेर असली, तरी चिंताजनक असल्याचे डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.