राष्ट्रवादी आघाडीसाठी अनुकूल

By admin | Published: January 16, 2017 01:15 AM2017-01-16T01:15:56+5:302017-01-16T01:15:56+5:30

दिलीप वळसे-पाटील : आज काँग्रेस पदाधिका:यांसोबत बैठक

Favorable for the NCP front | राष्ट्रवादी आघाडीसाठी अनुकूल

राष्ट्रवादी आघाडीसाठी अनुकूल

Next


जळगाव : तीन पंचवार्षिकपासून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर आहे. गेल्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने केवळ 4 जागा कमी मिळाल्याने सत्ता संपादन करता आली नाही. शिवसेना व भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी अनुकूल आहे. त्यासंदर्भात सोमवार, 16 रोजी काँग्रेस पदाधिका:यांसोबत बैठक होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मतविभाजन टाळण्याचे प्रयत्न
गेल्या 15 वर्षापासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात मतविभाजन होऊन त्याचा लाभ शिवसेना व भाजपाला झाला आहे. काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरू आहे. रविवारी सकाळी पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, विविध आघाडय़ांचे अध्यक्ष यांच्यासोबत पुन्हा बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता काँग्रेसचे प्रभारी विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन आघाडीबाबत चर्चा होणार आहे.

या बैठकीत जागा वाटप, तालुकास्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची स्थिती याबाबत चर्चा करून जागा वाटपाचे सूत्र ठरविण्यात येणार आहे. काँग्रेससोबत आघाडी न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Favorable for the NCP front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.