भय इथले संपत नाही... १८ दिवसात ३०६ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:47+5:302021-04-19T04:14:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थिती अत्यंत भयावह असून, सप्टेंबरनंतर एप्रिल महिना अधिक भयावह ठरल्याचे चित्र आहे. यात गेल्या १८ दिवसातच ३०६ मृत्यू झाले असून, २० हजार २५९ रुग्ण आढळून आले आहेत.
पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० या महिन्यात सर्वाधिक ३७१ मृत्यू झाले होते. त्यानंतर एप्रिलच्या १७ दिवसांमध्येच रुग्णसंख्या व मृत्यूचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेतील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. गंभीर बाब म्हणजे गेल्या चार दिवसात ८२ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. यात जळगाव शहरात सर्वाधिक ४५० मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. ही संख्या जिल्ह्याच्या २३ टक्के आहे.
एकूण रुग्ण - १०९२७७, बरे झालेले रुग्ण ९६१५३, ॲक्टिव्ह केसेस - १११९३, मृत्यू १९३१, दैनिक चाचण्या ९०२५
२०५६३ रुग्ण झाले बरे
एकीकडे रुग्णसंख्या व मृत्यू वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरासरी ११०० रुग्ण रोज बरे होत असून, गेल्या १८ दिवसात कोरोनाचे २० हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्या काहीशी घटल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. गेल्या १८ दिवसात २० हजार २५९ रुग्ण आढळून आले आहेत. यात १४ व १५ एप्रिल हे दोन दिवस वगळता सर्व १६ दिवसात रुग्णसंख्या १ हजारापेक्षा अधिकच नोंदविण्यात आली आहे.
अधिक मृत्यू असलेले पाच तालुके
जळगाव ५६३
भुसावळ २६६
चोपडा १३८
अमळनेर १२८
रावेर १२७
सर्वाधिक मृत्यू
सप्टेंबर ३७१
ऑक्टोबर ८३
नोव्हेंबर ३२
डिसेंबर २०
जानेवारी २९
फेब्रुवारी २७
मार्च २४०
एप्रिल १८ दिवस ३०६
दहा दिवसातील रुग्ण व मृत्यू
८ एप्रिल - रुग्ण ११९०, मृत्यू १५
९ एप्रिल - रुग्ण ११६७, मृत्यू १७
१० एप्रिल - रुग्ण ११५५, मृत्यू १८
११ एप्रिल - रुग्ण ११६७, मृत्यू १७
१२ एप्रिल - रुग्ण १२०१, मृत्यू १६
१३ एप्रिल - रुग्ण ११४३, मृत्यू १८
१४ एप्रिल - रुग्ण ९८४, मृत्यू २१
१५ एप्रिल - रुग्ण ९३४, मृत्यू २०
१६ एप्रिल - रुग्ण १०३३, मृत्यू २०
१७ एप्रिल - रुग्ण १११५, मृत्यू २१
१८ एप्रिल - रुग्ण १०५९, मृत्यू २२