भिज पावसाने पिके वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 04:07 PM2019-09-13T16:07:34+5:302019-09-13T16:09:34+5:30

भिज पावसामुळे मूग,उडीद,आदी. पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात असून, सततच्या भिज पावसामुळे मातीच्या धाब्याच्या घरांना गळती लागली आहे.

The fear of wasting crops by soaking rain | भिज पावसाने पिके वाया जाण्याची भीती

भिज पावसाने पिके वाया जाण्याची भीती

Next
ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील चित्रमातीच्या धाब्याच्या घरांना गळती



चोपडा, जि.जळगाव : तालुक्यात भिज पावसामुळे मूग,उडीद,आदी. पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात असून, सततच्या भिज पावसामुळे मातीच्या धाब्याच्या घरांना गळती लागली आहे. यामुळे अशा घरात रहाणे ग्रामस्थांना धोक्याचे वाटू लागले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र भिज पाऊस सुरू आहे. त्यामुळे कापूस पिकालाही फवारणीची दिली जात नसल्याने कापूस पिकावर मावा,तुडतूडे व किडंींचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सततच्या भिज पावसामुळे परिपक्व झालेले मूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मूग, उडदाच्या शेंगांमधून बाहेर कोंब येत आहेत. त्यामुळे हाताशी आलेले मुगाचे पिक वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. सततच्या भिज पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून, मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मजुरांना हाताला काम नसल्याने मजूर रिकामे आहेत.
या पावसामुळे मातीच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. अशी घरे साततत्याने गळू लागली आहेत. तसेच मातीची घरांतील भिंतीमध्ये पाणी झिरपल्याने भिंती पडून जीवित हानी होण्याची शक्यता बळावली आहे. मातीच्या घरातील नागरिक जीव धोक्यात घालून याच घरामध्ये राहत आहेत. सततच्या गळतीमुळे घरात ठिकठिकाणी गळके पाणी साठवण्यासाठी भांडी ठेवली जात आहे.
एकंदरीत, सततचा भिज पाऊस हा नुकसानीचा ठरत असून, शेतकरी उघडीप होण्याची वाट पाहत आहेत.

Web Title: The fear of wasting crops by soaking rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.