प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:10+5:302021-08-24T04:22:10+5:30
-अनिल मधुकर महाजन, प्रवासी, कृष्णापुरी बसचालकाच्या प्रसंगावधानाने आज बसमधील प्रवासी व मोटारसायकलवरील प्रवासी बाळंबाल बचावले. बसचालक जितेंद्र कुंभार यांच्या ...
-अनिल मधुकर महाजन, प्रवासी, कृष्णापुरी
बसचालकाच्या प्रसंगावधानाने आज बसमधील प्रवासी व मोटारसायकलवरील प्रवासी बाळंबाल बचावले. बसचालक जितेंद्र कुंभार यांच्या शिताफीच्या प्रयत्नामुळे बसखाली सापडणारी मोटारसायकल बसच्या बाजूला धडकली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. बसला जोरात ब्रेक लावल्याने वेगात असलेल्या बसचा अर्धा भाग रस्त्याच्या खाली उतरला व बस रोखली. यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
-शिवाजी शिंदे, प्रवासी, पिंपळगाव हरे
बसमध्ये सर्व सीटवर प्रवासी बसलेले होते. बुकिंग सुरूच होती, मात्र बसचालक जितेंद्र कुंभार यांच्या प्रयत्नाने मोठी दुर्घटना टळली.
एम. आर. शिंदे, महिला वाहक
मोटारसायकलवरील अशोक फुलपगारे (५५), कोकिळाबाई फुलपगारे (५०), रत्ना निकम (२६, सर्व, नांदगाव) हे तिघे बसवर आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे उपचारार्थ दाखल केले आहे.