मन मोकळे झाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:31+5:302021-07-19T04:12:31+5:30
सत्ताधारी असूनही आमच्या शब्दाला किंमत नसेल तर काय करावे? वरिष्ठांना सांगितले, पालकमंत्र्यांना सांगितले. कुणीही लक्ष देत नाही, अशी व्यथा ...
सत्ताधारी असूनही आमच्या शब्दाला किंमत नसेल तर काय करावे? वरिष्ठांना सांगितले, पालकमंत्र्यांना सांगितले. कुणीही लक्ष देत नाही, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली. त्यांच्या व्यथेला माजी पालकमंत्र्यांनी दुजोरा दिला. निरीक्षकही म्हणाले अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्या बदल्या झाल्याच पाहिजे. हा विषय आता उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार असल्याने येत्या काही दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांना लागली आहे. आपल्या व्यथा निरीक्षकांसमोर मांडून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मन मोकळे केल्याने कार्यकर्त्यांनाही हायसे वाटले.
- मोहन सारस्वत
कार्यकर्ते पडले तोंडघशी
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. पाच-पंचवीस पदाधिकारी अपेक्षित असताना मात्र शंभरपेक्षा जास्त
पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. गर्दी जमलेली पाहून नेत्यांनी थोडे बरे वाटले. पण हा आनंद क्षणापुरताच राहिला. गर्दी पाहून पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी वरिष्ठ पातळीवर असे कळवण्यात आले होते की, अमळनेरात विविध आघाड्या स्थापन नाहीत, विश्वासात घेतले जात नाही, मात्र इथे चित्र वेगळेच आहे. असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतही दुसरा गट सक्रिय असल्याचे गुपित उघड केले. आमदारांनी कार्यकर्त्यांना विचारणा केली की, आघाड्या स्थापन नाहीत का आणि विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या आघाडीच्या याद्याच सादर केल्या. त्यामुळे आदिक यांनी आढावा बैठक आटोपती घेतली. तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आवर्जून बैठकीला पदाधिकाऱ्यांना बोलवल्याने तक्रार करणारे कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडले.
- चुडामण बोरसे