आयएमए जळगावचा राज्यस्तरावर सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:59 PM2018-11-29T12:59:08+5:302018-11-29T12:59:45+5:30
जळगाव : मुंबई येथे आयएमएची वार्षिक परिषद नुकतीच होऊन यामध्ये जळगावातील चार पदाधिकाऱ्यांचा आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. वाय.एस देशपांडे यांच्याहस्ते ...
जळगाव : मुंबई येथे आयएमएची वार्षिक परिषद नुकतीच होऊन यामध्ये जळगावातील चार पदाधिकाऱ्यांचा आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. वाय.एस देशपांडे यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आयएमए जळगावचे सचिव डॉ. विलास भोळे यांनी गेल्या दहा वर्षात जळगाव आयएमए सभासदवाढीसाठी केलेल्या भरीव कामगिरीसाठी त्यांचा या परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला. राज्य स्तरावर त्यांचा हा चौथ्यांदा सत्कार करण्यात आला. या सोबतच आयएमएच्या केंद्र व राज्य सरकारकडे होणाºया विविध प्रश्नांवरील वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा तर आयएमए राज्य ‘सोशल सिक्युरिटी स्किम’च्या सदस्य नोंदणी वृध्दी करण्यासाठी आयएमए जळगावचे सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे यांचाही सत्कार करण्यात आला. या परिषदेसाठी जळगाव आमएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, राज्य आयएमएचे माजी सहसचिव डॉ. राजेश पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. जितेंद्र कोल्हे तसेच डॉ. नितीन भारंबे व डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.
डॉ. अनिल पाटील यांची राष्ट्रीय तर डॉ. स्नेहल फेगडे यांची राज्य पातळीवर निवड
या परिषदेमध्ये डॉ. स्नेहल फेगडे यांची राज्य आयएमए एएमएस व्हाईस चेअरमनपदी तर डॉ. अनिल पाटील यांची ‘हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडिया’च्या कोषागारपदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल जळगाव आयएमएतर्फे या निवडीचे स्वागत करण्यात आले.