भुसावळात कन्यारत्न प्राप्त मातापित्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:55 PM2017-09-03T17:55:34+5:302017-09-03T18:04:30+5:30
शारदा गणेश मंडळाचा उपक्रम : मुलगी असण्याची खंत पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असल्याची मान्यवरांची भावना
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.3 - शारदा नगरातील शारदा गणेश मंडळातर्फे फक्त दोन कन्या असणा:या मातापित्यांच्या रविवारी सत्कार करण्यात आला. समाजाने ज्या दांम्पत्याला मुली आहेत त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलविला पाहिजे, असे आवाहन हभप लक्ष्मण महाराज यांनी येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. नारखेडे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका रजनी इंगळे होत्या. शारदा गणेश मंडळाने फक्त दोन कन्या प्राप्त दाम्पत्यांचा सत्कार करून समाजात आदर्श निर्माण केल्याची भावना मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. रजनी इंगळे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मुलगी असण्याची खंत पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. ही न्यूनगंडता महिलांनी कमी केली पाहिजे. मुलीलाच वंशाचा दिवा मानले पाहिजे. मुलीवर चांगले संस्कार करून चांगले शिक्षण द्या, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन व आभार वाय.एच.चौधरी यांनी केले. यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील, प्रशांत ढाके, पंकज ढाके, भूषण कोळंबे, मनोज फालक, राजू पटेल, नारायण झटके, विजय भारंबे, के.यू. पाटील, आर.के. चौधरी, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
या दाम्पत्यांचा झाला सत्कार
सत्कारार्थी पालक - वैशाली दिनेश पाटील, ज्योती नारायण वरंजानी, जयश्री गणेश सपकाळे, योगिता प्रमोद चौधरी, भारती धीरज नेहते, शोभा योगेश शर्मा, योगिता राहूल पाटील, मनीषा राजू पटेल, रूपा दीपक अग्रवाल, शिल्पा अजय केदारे, भारती अमोल नेहेते, संगीता सचिन पाटील, सोनाली प्रशांत कुलकर्णी यांचा सत्कार हभप लक्ष्मण महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.