१३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:09 AM2019-02-05T00:09:45+5:302019-02-05T00:12:53+5:30

सुमारे १९ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळवून देणाºया शेतकºयांचा कळमसरे ग्रामस्थांनी श्रीराम मंदिरात जाहीर सत्कार केला.

 Felicitating the benefits of crop insurance to 13 thousand farmers | १३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार

१३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार

Next
ठळक मुद्देविम्याची भरपाई मिळण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा एकट्या कळमसरे गावाला मिळाले ८६ लाख

कळमसरे ता. अमळनेर : सन २०१७-१८ खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेतून विमा कंपनीने वगळलेल्या सुमारे तेरा हजार शेतकºयांसाठी विमा कंपनी, जिल्हा बँक, जिल्हाधिकारी ते थेट मंत्रालयापर्यत धडक मोर्चा, निवेदन देत सुमारे १९ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळवून देणाºया शेतकºयांचा कळमसरे ग्रामस्थांनी श्रीराम मंदिरात जाहीर सत्कार केला.
शेतकºयांनी विकास संस्थेमार्फत जिल्हा बँकेद्वारे ओरिएंटल विमा कंपनीकडे खरीप हंगामात पीक विमा हप्ता भरला होता. जळगाव जिल्हयाला पीक विमा मंजूर झाला मात्र अमळनेर तालुक्यातील कळमसरेसह १८ गावांना कंपनीने वगळले होते. या विरोधात कळमसरे,निंभोरा,गडखांब, शिरूड इ.गावातील निवडक शेतकºयांनी एकत्र येऊन निवेदन, मोर्चा, ठिय्या आंदोलन आदी सनदशीर मार्गार्ने सतत तीन महिने लढा दिला. आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी यांच्या मध्यस्थीने थेट केंद्रीय कृषिमंत्रीपर्यत शेतकºयांची समस्या पोहचली होती आणि हेक्टरी २१,२६७ या दराने सुमारे १९ कोटी पीक विमा रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली.
एकट्या कळमसरे गावाला ८६ लाख ३४ हजार ३०७ रुपये मिळाले. आंदोलक शेतकºयांच्या प्रयत्नाला यश आल्याने कळमसरे ग्रामस्थांनी सुरेश पिरन पाटील, गोकुळ बोरसे, प्रा.हिरालाल पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, किरणसिंग सिसोदीया, भिकेसिंग पाटील, गुलाब तोताराम महाजन, अंबालाल राजपूत, रणजित पाटील, मुरलीधर चौधरी, झुलाल चौधरी, जितेंद्रसिंग पाटील, कडू चौधरी, सुरेश चौधरी, हिरालाल महाजन, सुधाकर पाटील, अरूणसिंग पाटील, जितेंद्र मधुकर महाजन, मंगलसिंग गिरासे आदी आंदोलक शेतकºयांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच प्रल्हाद महाजन अध्यक्षस्थानी होते. सुत्रसंचलन प्रा.एच.पी.पाटील यांनी केले.या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Felicitating the benefits of crop insurance to 13 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.