बंदुकीच्या गोळ्यांची फैरी झाडून शहीद पोलिसांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:25 PM2017-10-21T15:25:15+5:302017-10-21T15:30:20+5:30
१ सप्टेबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत देशभरात ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना शनिवारी पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बंदुकीच्या गोळ्यांची तीन फैरी झाडून श्रध्दांजली वाहण्यात आली. भुसावळ येथील मिलीटरी कमांडर सुनील कदम, लेफ्टनंट कर्नल पी.जे.निंबाळकर, वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीचे अधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार चंदूलाल पटेल, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रशिद तडवी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २१ : १ सप्टेबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत देशभरात ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना शनिवारी पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बंदुकीच्या गोळ्यांची तीन फैरी झाडून श्रध्दांजली वाहण्यात आली. भुसावळ येथील मिलीटरी कमांडर सुनील कदम, लेफ्टनंट कर्नल पी.जे.निंबाळकर, वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीचे अधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार चंदूलाल पटेल, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रशिद तडवी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारक येथे शनिवारी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला.यावेळी हुतात्मा स्मारकास पुष्पांजली अर्पण करुन परेडही घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, ज्ञानेश फडतरे यांनी शहीदांचे नामवाचन केले. मिलिंद केदार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी निवृत्त प्राचार्य चारुदत्त गोखले, दिप्ती कराळे, बी.एम.महाजन, मनोज येवले, लालचंद पाटील, रवींद्र पाटील, नारायण मनियार यांच्यासह पोलीस दलातील सेवेतील तसेच निवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस हुतात्मा दिवस म्हणजे काय?
२१ आॅक्टोर १९५९ रोजी हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशातील लद्दाख येथील हॉट स्प्रींग या सरहद्दीवर सीआरपीएफचे जवान गस्तीवर असताना अचानक चिनी फौजांनी या जवानांवर हल्ला केला होता. हा हल्ला परतवून लावताना यात १० जवान शहीद झाले होते. त्या शूर जवानांच्या त्यागाप्रित्यर्थ संपूर्ण भारतात २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.